केळझरच्या पाण्यामुळे दिलासा

केळझरच्या पाण्यामुळे दिलासा

निरपूर । वार्ताहर Nirpur

बागलाण तालुक्यातील ( Bgalan Taluka ) नवे निरपूर, चौंधाणे, खमताणे, मुंजवाड, कंधाणे पंचक्रोशीतील पाणीटंचाई (Water scarcity ) लक्षात घेत जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दि. 11 ते 19 एप्रिलपर्यंत केळझर धरणातून ( Kelzhar Dam ) 56 द.ल.घ.फूट पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे उपरोक्त परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही महिने सुटणार असल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.

नवे निरपूर, चौंधाणे, खमताणे, मुंजवाड, कंधाणे पंचक्रोशीतील ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने नवे निरपूर सरपंच मुन्ना सूर्यवंशी, माजी सरपंच भाऊसाहेब सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली आजी-माजी आमदार व सटाणा बाजार समितीचे माजी सभापती अशोक सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थ व सरपंचांनी तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकार्‍यांना केळझर धरणाचे पाणी आवर्तन सोडण्याबाबत निवेदन दिले होते.

याबाबत ‘देशदूत’ने ( Daily Deshdoot ) विस्तृतपणे वृत्त प्रसारित करून परिसरातील गावांच्या पिण्याच्या पाणीटंचाईचे वास्तव मांडून ग्रामस्थांच्या मागणीचा पाठपुरावा केला होता. त्याची दखल घेत जिल्हाधिकार्‍यांनी केळझरचे आवर्तन सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांनी ‘देशदूत’ला धन्यवाद देत समाधान व्यक्त केले आहे.

Related Stories

No stories found.