भोजापूर धरणातून आवर्तन सोडा: आ. कोकाटें

पाटबंधारे अधिकार्‍यांसोबत बैठक
भोजापूर धरणातून आवर्तन सोडा: आ. कोकाटें

सिन्नर । प्रतिनिधी Sinnar

भोजापूर धरणातून (Bhojapur dam) पिण्याचे पाणी (dinking water) सोडण्याच्या आमदार माणिकराव कोकाटे (MLA Manikrao Kokate) यांनी पाटबंधारे विभागाच्या (Irrigation Department) अधिकार्‍यांना सुचना केल्या आहेत. नुकतेच नांदुरशिंगोटे (Nandurshingote) येथे पाटबंधारे विभाग कार्यालयात (Irrigation Department Office) अधिकार्‍यांसोबत बैठक घेण्यात आली.

परिसरातील बंधारे व छोटे-मोठ तलाव भरण्यासाठी दि. 8 ते 11 फेब्रुवारी दरम्यान पाणी सोडण्याचे सुचना त्यांनी अधिकार्‍यांना दिल्या. या बैठकीमध्ये पाटबंधारे विभागाने आजमितीला शिल्लक असलेल्या पाण्याचे वाचन करून दाखविले. त्यापैकी किती पाटचारीद्वारे पाणी सोडले जाईल याबाबत नियोजन सांगितले. प्रत्येक गावातील बंधारे भरण्यासाठी पाटबंधारे विभाग कसोशीने प्रयत्न करत आहे.

पूरचारीला पाणी सोडल्यानंतर पाटबंधारे विभागाचे कर्मचारी परिसरातील शेतकरी (farmers) यांच्यासमवेत आ. कोकाटे उपस्थित राहणार आहे. आ. कोकाटे यांनी यापूर्वी 11 कोटी रुपये इतका निधी (fund) उपलब्ध करून दिला आहे. आज डाव्या व उजव्या कालव्यावर कुठेही आउटलेट दिसत नसल्याची खंत शेतकर्‍यांनी यावेळी बोलून दाखविली. या कामांची ऑडिट (Audit of works) होणे गरजेचे असल्याची बाब शेतकर्‍यांनी निदर्शनास आणून दिली.

दोडी बुद्रुक येथील पाणी वापर संस्थेने यापूर्वी प्रत्येक ठिकाणी नियोजनबद्ध काम केले आहे. भोजापूर धरणातून शेवटच्या शेतकर्‍यापर्यंत पाणी पोहोचविण्याचे काम संस्थेद्वारे करण्यात आले होते. सहा वर्षांपूर्वीपासून या संस्थेने पाणी सिंचनाचे काम केले. पाणी संस्थेचा केवळ पाटबंधारे विभागाने वापर केल्याचा आरोप गणपत केदार यांनी केला.

ज्या ठिकाणी पाण्याची गळती होत आहे ती प्रथम दुरुस्त करावी अशी मागणी त्यांनी केली. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ, बाजार समितीचे सभापती लक्ष्मणराव शेळके, संदीप शेळके, पी. जी. आव्हाड, बी. आर. चकोर, पाटबंधारे विभागाचे पाटील, आचट यांच्यासह नांदूरशिंगोटे, मानोरी, कणकोरी, दोडी बुद्रुक, दोडी खुर्द, चास, नळवाडी, पळसखेडे, करे, निमोण, पिंपळे या भागांतील शेतकरी उपस्थित होते.

आऊटलेट टाकण्याची मागणी

पाटबंधारे विभागाने पाण्याचे नियोजन व्यवस्थितरित्या करण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली. पाटबंधारे विभागाचे पाणी वितरण व्यवस्थेचे नियोजनशून्य कारभारामुळे निम्मेसुध्दा पाणी शेवटच्या शेतकर्‍यांपर्यंत पोहोचत नाही. यासाठी पाटबंधारे विभागाने ठिकठिकाणी आउटलेट टाकणे गरजेचे असल्याची मागणी संदीप शेळके यांनी केली. प्रत्येक ठिकाणी आउटलेट टाकल्यास शेतकरीवर्गाला पाणी विभागणी करण्यास कुठलीही अडचण येणार नाही व त्यामुळे कुठलाही वाद उद्भवणार नसल्याचे त्यांनी आ. कोकाटे यांना सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com