'चला खेळ खेळू या' पुस्तकाचे प्रकाशन

'चला खेळ खेळू या' पुस्तकाचे प्रकाशन

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

विविध खेळांची थोडक्यात माहिती होण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक (Ravindra Naik) यांच्या पुढाकाराने चला खेळ खेळू या (Chala Khel Kheu Ya) हे जिह्यातील काही क्रीडा प्रेमींनी पुस्तक लिहिलेले आहे....

या पुस्तकाचा (Book) प्रकाशन सोहळा पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या हस्ते पार पडला. यावेळी पालकमंत्र्यांनी आपले मनोगत व्यक्त करून हे पुस्तक प्रत्येकासाठी उपयोगी व मार्गदर्शक ठरेल असे सांगितले व लॉकडाऊन काळातील एक चांगले काम म्हणून गौरव केला.

यावेळी जिल्हाधिकारी सुरज मांढरे (Suraj Mandhare), पोलीस आयुक्त दीपक पांडेय (Deepak Pandey), महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव (Kailash Jadhav), जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड (Leena Bansod), जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील (Sachin Patil) व निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे (Bhagwat Doiphode) आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात सर्व खेळाडू हे शाळा, महाविद्यालयातून अथवा विविध क्रीडा संस्था यांच्या माध्यमातून पुढे येत आहेत. जिल्ह्यात शाळा महाविद्यालयांची संख्या पण जास्त असून जवळपास प्रत्येक शाळा महाविद्यालयास क्रीडांगण, हॉल, उपलब्ध आहेत.

क्रीडांगणाचा हॉलचा जास्तीत जास्त वापर होण्याच्या दृष्टीने आणि खेळाडू, क्रीडा शिक्षक, पालकांना विविध खेळांची थोडक्यात का होईना माहिती होणे आवश्यक आहे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे पुस्तक लिहिले आहे.

पाटलांची कल्पना; नाईकांचा पुढाकार

गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये शाळा महाविद्यालय, क्रीडा संस्था सर्व बंद होते. या काळात मविप्रचे क्रीडा संचालक हेमंत पाटील यांनी दूरध्वनीद्वारे या काळात घरात बसून काहीच करू शकत नाही मात्र, या काळात विविध खेळांची माहिती देणारे पुस्तक आपण सर्वांनी मिळून काढले तर ते एक मार्गदर्शक ठरू शकेल अशी कल्पना मांडली. लागलीच जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी संबंधित सर्व क्रीडा प्रेमींना एकत्र करत पुढाकार घेऊन प्रत्येकाकडून लिहून घेतले असल्याचे यावेळी बोलताना सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com