वस्तू व सेवा कर कायदा समजून घेण्यासाठी नियमित अभ्यास गरजेचा - काले

वस्तू व सेवा कर कायदा समजून घेण्यासाठी नियमित अभ्यास गरजेचा - काले

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

कोणत्याही क्षेत्रामध्ये ठराविक वेळेनंतर बदल होत असतात व हे बदल सद्य परिस्थिती नुसार आवश्यकही असतात. जीएसटी कायदा (GST Act) आल्यापासून तर तो सर्वांना समजून घेण्यापर्यंत त्यात सातत्याने बदल होत गेले.

त्यामुळे आपल्याला वस्तू व सेवा कर कायदा समजून घेणे व त्याचा नियमित अभ्यास करणे फार महत्त्वाचे आहे. तरच आपण यशस्वी कर सल्लागार (Tax consultant) होऊ शकतो असे मत महाराष्ट्र विक्रीकर न्यायाधिकरण (Maharashtra Sales Tax Tribunal) सदस्य सुमेरकुमार काले (Sumer Kumar Kale) यांनी व्यक्त केले.

नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, गुड्स अँड सर्विस टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिसनर्स असोसिएशन यांच्यावतीने आयोजित "कर व्यवसायिकांसाठी युक्तीच्या चार गोष्टी" या वेबिनारच्या चर्चासत्रात ते बोलत होते.

यावेळी बोलतांना काले यांनी सांगितले कि, प्रत्येक काम हे आनंदाने व उत्साहाने करता आले पाहिजे. तसेच मुदतीत काम संपवायच्या मागे आपले वैयक्तिक आयुष्य देखील जपता आले पाहिजे, शक्य होईल तेवढेच काम करण्याचा प्रयत्न करा व आपले आरोग्य ही जपले पाहिजे. कर सल्लागार म्हणून काम करत असताना कोणते काम केले पाहिजे व ते कधी करावे याचे काटेकोरपणे नियोजन केले पाहिजे.

तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आणि वरिष्ठ कर सल्लागार अनिल चव्हाण (Tax Consultant Anil Chavan) यांनी यशस्वी व उत्तम कर सल्लागार कसे होऊ शकता याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच कर सल्लागार हे नेहमीच व्यवसायिक उद्योजकांसाठी (Entrepreneurs) मोलाचे काम करत असतात परंतु कर सल्लागारांसाठी या विशेष कार्यक्रमाचे नियोजन केले त्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.

तर पुणे येथील ॲड. व तज्ञ कर सल्लागार नरेंद्र सोनवणे (Narendra Sonawane) यांनी कर क्षेत्रातल्या बदल्यामुळे बदललेली व्यवसाय कार्यपद्धती याबद्दल मार्गदर्शन केले. शेवटच्या सत्रात किशोर लुल्ला (Kishore Lulla) यांनी व्यवसायातल्या जबाबदाऱ्या आणि त्यासाठीचे नियोजन याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन डोंगरे (Nitin Dongre) यांनी तर आभार ॲड. प्रदीप क्षत्रिय (Adv. Pradeep Kshatriya) यांनी मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com