आधी नोंदणी, मगच लसीकरण

कोव्हिन अँपवर नोंदणी बंधनकारक
आधी नोंदणी, मगच लसीकरण

नाशिक । Nashik

करोना लसीकरण मोहीमेतील गोंधळ टाळण्यासाठी लस घेण्यासाठी पूर्वनोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. १८ ते ४५ या वयोगटातील करोना लसीकरणासाठी पात्र असणाऱ्या सर्वांना पूर्वनोंदणी बंधनकारक असणार आहे.

करोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात १८ वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. मात्र, आता कोरोनाची लस घेण्यासाठी पूर्वनोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. १८ ते ४५ या वयोगटातील कोरोना लसीकरणासाठी पात्र असणाऱ्या सर्वांना पूर्वनोंदणी आणि आगाऊ वेळ घेणे आवश्यक आहे.

कोव्हिन किंवा आरोग्य सेतू अॅपवर सदर पूर्वनोंदणी करावयाची आहे. अन्यथा कोरोनाची लस दिली जाणार नाही, असे सांगितले जात आहे. मात्र, ४५ वर्षांवरील सर्वांना लसीकरण केंद्रावर जाऊन नोंदणी करण्यास मुभा देण्यात आली आहे.

१८ वर्षांवरील सर्वांना करोना लस दिली जाणार असल्यामुळे करोना केंद्रावरील गर्दी वाढून व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर ४५ वर्षांपर्यंतच्या पात्र सर्वांना कोव्हिन आणि आरोग्य सेतूवर पूर्वनोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे.

यामुळे पुढे होणारा गोंधळ टाळता येऊ शकेल, असे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.