रेल्वेमार्गासाठी पहिली जमीन खरेदीची नोंदणी

रेल्वेमार्गासाठी पहिली जमीन खरेदीची नोंदणी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

पुणे-नाशिक नवीन रेल्वेमार्गासाठी ( Nashik-Pune Railway ) भूसंपादन प्रक्रियेसाठी ( Land acquisition )केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सिन्नर तालुक्यातील मौजे बारागाव पिंप्री ( Baragaon Pimpri )येथील शेतकरी कमळाबाई कुर्‍हाडे यांनी त्यांच्या मालकीच्या जमिनीचे जिल्ह्यातील पहिले खरेदीखत नोंदवले आहे.

पुणे-नाशिक दुहेरी मध्यम द्रुतगती ब्रॉडगेज लाईनच्या विद्युतीकरण व बांधकामासाठी प्रस्तावित खासगी जमीन वाटाघाटीनेे थेट खरेदी पद्धतीने ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू आहे. सिन्नर तालुक्यातील मौजे बारागावपिंप्री येथील शेतकरी कमळाबाई कुर्‍हाडे यांच्या गट क्रमांक 673 च्या 0.5900 हेक्टर आर क्षेत्रासाठी जिल्हास्तरीय समितीने 1,01,84,760/-(एक कोटी एक लाख चौर्‍याऐंशी हजार सातशे साठ) रुपयांचा मोबदला निश्चित केला आहे.

कुर्‍हाडे, महारेल आणि महसूल अधिकारी यांनी दुय्यम निबंधक कार्यालय, सिन्नर येथे पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाचे जिल्ह्यातील पहिले खरेदीखत नोंदवले आहे. हे खरेदीखत नोंदवण्यासाठी पुढील सहा महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला. पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पात जमीन संपादित होणार्‍या इतर जमीनधारकांनीही संमतीने सहा महिन्यांत वाटाघाटी व सहमतीने खरेदीखत नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.