नोंदणी विवाह संकेतस्थळ झाले ठप्प

नोंदणी विवाह संकेतस्थळ झाले ठप्प

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

सर्वत्र लग्नाची (marriage) धामधुम सुरू असतांना नोंदणी कार्यालयाचे (Registration Office) विवाह नोंदणी संकेतस्थळच (Marriage Registration Website) ठप्प झाले असल्याने अनेक नवदाम्पत्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

दरम्यान, गेल्या चार दिवसांपासून संकेस्थळ बंद (Website closed) असल्याने नोंदणी विवाह संदर्भातील चलन आणि नोटीसीचे कामकाजच बंद झाल्याने नोंदणी विवाहोत्सुकही खोळंबले आहेत. शासनाने विशेष विवाह नोंदणी प्रक्रियेचे संगणकीकरण (Computerization of registration process) करून विवाह अधिकार्‍यांची कार्यालये मध्यवर्ती सर्व्हररला जोडली आहेत.

त्यामुळे सर्व्हर डाऊन (Server down) झाले की संपुर्ण यंत्रणाच ठप्प होते. त्याचा फटका नोंदणी पद्धतीने विवाहासाठी इच्छुक असलेल्यांना होतो. नाशिकमध्ये (nashik) गेल्या 21 तारखेपासून सर्व्हर बंद असल्यामुळे नेांदणीचे कामकाज तुर्तास थांबले आहे. दोन दिवसात कामकाज पुर्ववत होईल असे येणार्‍यांना सांगितले जात होते. परंतु सोमवार (दि.25) पर्यंतही ऑनलाईन (online) कामकाच बंदच असल्याने नोंदणी नेाटीसचा कालावधी पुढे जात असल्याने संबंधितांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

विवाह कायद्याअंतर्गत विवाहाच्या नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज (Online application for registration) करण्याची प्रक्रीया केली जाते. त्यामुळे विवाहोत्सुकांना घरबसल्या अशाप्रकारची नोंदणी करता येऊ शकते. ऑनलाईन पद्धतीने भरलेले अर्ज विवाह नोंदणी कार्यालयाकडे (Marriage Registration Office) दाखल झाल्यानंतर त्यांना अप्रुव्हल देणे आणि चलन काढण्याचे कामकाज विवाह अधिकारी कार्यालतून केले जाते. परंतु या कामकाजाला आता सर्व्हरचा अडसर निर्माण झाला आहे. गेल्या चार दिवसांपासून ठप्प असलेल्या कामकाजामुळे नवीन नोंदणी, अप्रुव्हल आणि चलन काढण्याचे कामकाज होऊ शकलेले नाही.

गेल्या 21 तारखेपासून बंद असलेले ऑनलाईन प्रुव्हलचे कामकाज सोमवारपासून सुरू होईल या अपेक्षेने अनेकांनी या कार्यालयात विचारणा केली मात्र त्याबाबतची अनिश्चितता सांगण्यात आल्याने इच्छुकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भातील विचारणा करण्यासाठी कार्यालयात येऊन विचारणा होऊ लागल्याने अखेर कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच विवाह नोंदणी (Marriage registration) होणार्‍या नोटीसची साईटच बंद असल्याचा फलक लावण्यात आला आहे. साईट बंद असल्यामुळे त्याअंतर्गत होणार्‍या नोटीस आणि चलनचे कामकाज सध्यातरी बंद आहे.

सर्व्हर डाऊन झाल्यामुळे तुर्तास नोटीस आणि चलनचे कामकाज बंद ठेवण्यात आले आहे मात्र साईट बंद असल्यामुळे कामकाज अडून राहिलेले नसल्याचा दावा विवाह नोंदणी कार्यालयाच्यावतीने करण्यात आला आहे. दोन दिवस शासकीय सुट्या होत्या असल्याने येत्या एक दोन दिवसात साईट पुन्हा सुरू होणार असल्याचेही सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.