लसीकरण केंद्रावर नाव नोंदविणे गरजेचे

लसीकरण केंद्रावर नाव नोंदविणे गरजेचे

येवला | प्रतिनिधी | Yeola

शहरातील लसीकरण केंद्रावर (Vaccination Center) होणारी गर्दी व गोंधळ टाळण्यासाठी आरोग्य विभागाने (Health epartment) नागरिकांसाठी प्रतीक्षा यादी (Waiting list) बनविण्याचे ठरविले आहे. नागरिकांनी या यादीमध्ये आपले नाव नोंदविणे (Registration) गरजेचे असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालय येवला (Sub-District Hospital, Yeola) यांनी दिली आहे...

प्रतीक्षा यादीत नाव नोंदणी केल्यास आपणास प्रतीक्षा यादी क्रमांक असलेले टोकन दिले जाईल. ज्या प्रमाणात लस उपलब्ध होईल त्या प्रमाणात प्रतीक्षा यादीतील क्रमानुसार लाभार्थ्यांचे लसीकरण केले जाईल. यामुळे आरोग्य प्रशासनावर अतिरिक्त ताण येणार नाही.

नागरिकांनादेखील दररोज लसीकरण केंद्रावर फेर्‍या मारण्याची गरज राहणार नाही. पहिला डोस असो किंवा दुसरा डोस प्रतीक्षा यादीत नाव नोंदविणे आवश्यक आहे. उपजिल्हा रुग्णालय येवला येथे दररोज सकाळी १० ते १२ या वेळेत ही नोंदणी करण्यात येणार आहे.

नोंदणी करताना आधारकार्ड व मोबाईल नंबर आवश्यक आहे. केंद्रावर लसीकरणासाठी येताना प्रतीक्षा यादी टोकन सोबत आणल्या शिवाय लस घेता येणार नाही, अशी माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com