हमीभावाने मका खरेदीसाठीची नोंदणी सुरू

हमीभावाने मका खरेदीसाठीची नोंदणी सुरू

पंचाळे । प्रतिनिधी panchale / sinnar

यावर्षीच्या खरीप हंगामातील kharif season मका हमीभावाने खरेदीसाठीची purchase of maize नोंदणी प्रक्रिया 11 सप्टेंबर पासून सुरू झाली आहे. सिन्नर तालुक्यातील शेतकर्‍यांनी खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात मका नोंदणी करावी असे आवाहन व्यवस्थापक संपत चव्हाणके यांनी केले आहे.

खरीप हंगाम 2021-22 साठी केंद्र शासनाने मक्यासाठी 1 हजार 870 रुपये हमीभाव जाहीर केला आहे. यावर्षी नोंदणी प्रक्रिया वेळेवर सुरू करण्याचे आदेश शासनाने दिले. त्यामुळे भविष्यात शेतकर्‍यांना मका विक्रीसाठी त्रास कमी होणार आहे.

वीस दिवस नोंदणी प्रक्रिया सुरू राहणार असून शेतकर्‍यांनी सन 2021-22 खरीप हंगामातील मका पिकाची नोंद असलेला सातबारा खाते उतारा, लागवडीखालील क्षेत्र, शेतकर्‍यांचे आधार कार्ड झेरॉक्स, आयएफसी कोड असलेल्या बँक पासबुकची झेरॉक्स आदी कागदपत्रे यासाठी आवश्यक आहे.

पीक नोंदणी यासाठी बंधनकारक आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी शेतामध्ये उभे असलेल्या मका पिकाची मोबाईल अ‍ॅपद्वारे नोंदणी करावी. नोंदणी प्रक्रिया 30 सप्टेंबर पर्यंत सुरू राहणार असून मका उत्पादक शेतकर्‍यांनी सर्व कागदपत्रे नोंदणीसाठी त्वरित कार्यालयात घेऊन यावे असे आवाहन संघाच्यावतीने करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com