कृषी पदवी प्रवेशासाठी नोंदणी सुरू

18 नोव्हेंबरपर्यंत संधी, 15 हजार जागा
कृषी पदवी प्रवेशासाठी नोंदणी सुरू

नाशिक । प्रतिनिधी Nashik

करोनाच्या प्रादुर्भावामुळे 2021-22 शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रिया लांबल्या होत्या. एमएचटी-सीईटीनिकालानंतर आता कृषी शाखेच्या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी Agriculture Degree Admission वेळापत्रक प्रसिद्ध झाले आहे. राज्यातील कृषी विद्यापीठांशी संलग्नित महाविद्यालयांत बीएसस्सी कृषी पदवीसह प्रथम वर्ष पदवी शिक्षणक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज online processकरावे लागतील.

दरम्यान यासंदर्भात महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार अभ्यासक्रम प्रवेशासाठी नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली असून 18 नोव्हेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया कॅप राऊंडद्वारे पार पडेल.

राज्यात 191 महाविद्यालयांमधील 15,337 जागांवर प्रवेश दिले जाणार आहेत. प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना https://ug.agriadmissions.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी करतेवेळी विद्यार्थ्यांस वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, अधिभार, प्रवर्गविषयक माहिती भरावयाची आहे. त्याच्याशी संबंधित मूळ कागदपत्रे स्कॅन करून वेबसाइटवर अपलोड करावी लागणार आहेत.

प्रवेश प्रक्रियेबाबतची माहिती पुस्तिका विद्यार्थ्यांना वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. माहिती पुस्तिकेतील माहितीच्या आधारे महाविद्यालयाचा दर्जा, वार्षिक शुल्काबाबत विद्यार्थ्यांना माहिती मिळते. उमेदवारांनी माहिती विचारात घेऊन विचारपूर्वक जास्तीत जास्त महाविद्यालयांचे विकल्प भरावेत,असे आवाहन महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने केले आहे.

या प्रक्रियेंतर्गत प्रारूप गुणवत्ता यादी 22 नोव्हेंबरला प्रसिद्ध होईल. या यादीबाबत हरकती तक्रार नोंदवण्यासाठी 23 ते 25 नोव्हेंबरदरम्यान मुदत असेल. ग्राह्य धरलेल्या हरकतींचा तपशील 27 तारखेला प्रसिद्ध केला जाईल. 29 नोव्हेंबरला अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. 2 डिसेंबरला पहिली जागा वाटप यादी प्रसिद्ध होईल. प्रवेश घेण्यासाठी विद्याथ्र्यांना 3 व 4 डिसेंबर ही मुदत असेल. त्यानंतर दुसरी जागा वाटप यादी 7 डिसेंबरला जाहीर होणार असून प्रवेशासाठी 8 व 9 डिसेंबरचा कालावधी असेल.

महाविद्यालयस्तर प्रक्रिया डिसेंबर अखेर

महाविद्यालय स्तरावरील उपलब्ध जागांचा तपशील 21 डिसेंबरला प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित संस्था, महाविद्यालयाकडे व्यक्तिशः प्रवेशाकरिता अर्ज दाखल करण्यासाठी 23 व 24 डिसेंबर ही मुदत असेल, तर 25 डिसेंबरला निवड यादी जाहीर झाल्यानंतर या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी 27 ते 29 डिसेंबर या दरम्यान प्रवेश घ्यावा लागेल.

असे आहेत अभ्यासक्रम

बीएस्सी ऑनर्स कृषी, बीएस्सी ऑनर्स उद्यानविद्या, बीएस्सी ऑनर्स वनविद्या, बीटेक कृषी अभियांत्रिकी, बीटेक अन्नतंत्रज्ञान, बीएस्सी ऑनर्स सामाजिक विज्ञान, बीटेक जैवतंत्रज्ञान, बीएफएस्सी मत्स्यशास्त्र, बीएस्सी ऑनर्स कृषी व्यवसाय व्यवस्थापन आदी अभ्यासक्रमांचा समावेश आहे. प्रवेश प्रक्रियेत कायमस्वरूपी विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये 20 टक्के जागा संस्थास्तरीय कोट्यासाठी राखीव असतात. उर्वरित जागांमध्ये 30 टक्के राज्याचा तर 70 टक्के कोटा कृषी विद्यापीठाचा असतो.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com