पैसे देण्यास नकार, मोबाईलवरून अश्‍लिल शिवीगाळ

पैसे देण्यास नकार, मोबाईलवरून अश्‍लिल शिवीगाळ

नाशिक | Nashik

मागणी केल्यानंतर उसणवारीत पैसे देण्यास नकार दिल्याने एका महिलेने दुसर्‍या महिलेस व तीच्या मुलीला मोबाईलवरून अश्‍लिल शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तीच्यावर पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शबनम उर्फ समीना गफुर मोमीन (२८, रा. कडेगाव, जि. अहमदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित महिलेचे नाव आहे.

याप्रकरणी भद्रकाली परिसरातील महिलेने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पिडीतेच्या पतीकडे सबंधीत महिलेने पैशांची मागणी केली होती. ते पैसे देण्यास नकार दिल्याने तीने

मार्च ते १५ एप्रिल पर्यंत वेळोवळी मोबाईलद्वारे फोन करून पिडीत महिला व तीच्या अल्पवयीन मुलीस अश्‍लिल भाषेत शिवीगाळ केली.

याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरिक्षक सोनवणे करत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com