इंधन कर कमी करा; भाजप युवा मोर्चाची मागणी

इंधन कर कमी करा; भाजप युवा मोर्चाची मागणी

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

येथील भाजप युवा मोर्चातर्फे (BJP Youth Front) पेट्रोल (petrol), डिझेलचे (Diesel) दर कमी करण्यासाठी राज्य शासनाने (state government) कर करावेत, अशी मागणी तहसीलदार चंद्रजित राजपूत (Tehsildar Chandrajit Rajput) यांच्याकडे एका निवेदनाद्वारे (memorandum) केली आहे.

जनतेला महागाईपासून (Inflation) दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने (central government) उत्पादन शुल्कातून पेट्रोलवर 8 रूपये आणि डिझेलवर 6 रूपये कर कमी केले आहेत. यामुळे केंद्र सरकारवर जवळपास 2 लाख कोटींपेक्षा जास्तीचा बोजा पडणार आहे. जनतेचे हित लक्षात घेत केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे. सद्यस्थितीत केंद्र सरकार हा कर 19 रुपये आकारत आहे तर राज्य सरकार (state government) 30 रूपये आकारत आहे.

संपुर्ण देशात महाराष्ट्र राज्य (mahrashtra state) पेट्रोल-डिझेलवर सर्वात जास्त कर आकारणारे राज्य असून जनहित व महागाई (Inflation) कमी करण्यासाठी राज्य शासनाने तत्काळ इंधनावरील कर कमी करावा. देशातील इतर राज्ये 17-18 रूपये कर आकारत असतांना महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi government) एवढ्या मोठ्या प्रमाणात आकारलेला कर सर्वसामान्य जनतेवर मोठा अन्याय असल्याचे निवेदनात म्हटले आहे. राज्य सरकारद्वारे आकारण्यात येणारा इंधनावरील कर कमी केल्यास महागाईला आळा बसेल व जनतेला दिलासा मिळेल.

यास्तव येत्या 3 दिवसात निर्णय न घेतल्यास आक्रमक आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी भाजप जिल्हा संघटन सरचिटणीस देवा पाटील, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस कुणाल सूर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस सुनील शैलार, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष श्याम गांगुर्डे, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष स्वप्निल भदाणे, संदीप पाटील, बापू सूर्यवंशी, शुभम लोंढे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com