कांदा लिलावास प्रारंभ

 कांदा लिलावास प्रारंभ

उमराणे | विनोद पाटणी

स्व.निवृत्ती काका देवरे कृषि उत्पन्न बाजार समिती, उमराणे (Late Nivruttee kaka devre APMC Umrane)येथे विजयादशमी निमित्ताने नवीन लाल कांदा खरेदी शुभारंभ सभापती प्रशांत देवरे यांच्या हस्ते वाहन पूजन व माजी सभापती विलास देवरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.

दरवर्षी विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर नवीन लाल कांद्याचा लिलावाचा ( Onion Auction )शुभारंभ प्रथम आलेल्या वाहनाला उच्च भाव लावून व्यापारी खरेदीचा शुभारंभ करीत असतात काल तिसगाव येथील शेतकरी कमलाकर काळू आहेर यांच्या कांद्यास सर्वोच्च ७१७१ रुपये क्विंटल भाव मिळाला.

कानुबाई आडतचे संचालक सतीश पंडित देवरे यांनी सर्वात उंच बोली लावून खरेदी केला. सभापती प्रशांत देवरे यांच्या हस्ते शेतकरी कमलाकर आहेर व व्यापारी सतीश देवरे यांचा सत्कार करण्यात आला.

ह्याप्रसंगी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संदेश बाफना ,मार्गदर्शक सुनिल देवरे आदी सर्व कांदा व भुसार व्यापारी सर्व संचालक शेतकरी उपस्थित होते संयोजन बाजार समितीचे सचिव नितिन जाधव यांनी व आभार प्रदर्शन सहायक सचिव तुषार गायकवाड यांनी केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com