
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
जिल्हा सैनिक कार्यालयाच्या (District Soldier's Office) अधिपत्याखालील त्र्यंबक रोड (Trimbak Road) येथील सैनिकी मुले व मुलींच्या वसतिगृहाकरिता (Hostel) अशासकीय कर्मचाऱ्यांची तात्पुरत्या स्वरूपात भरती (Staff recruitment) करण्यात येत आहे....
इच्छुक व पात्र माजी सैनिक आणि वीरपत्नी यांनी १० एप्रिलपर्यंत जिल्हा सैनिक कार्यालय, नाशिक येथे अर्ज (Application) सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ओमकार कापले (Omkar Kaple) यांनी केले आहे.
तात्पुरती भरायची पदे
मुलांचे वसतिगृह वसतिगृह अधीक्षक १ (पुरुष).
सहायक वसतिगृह अधीक्षक १ (पुरुष).
सफाई कामगार २.
मुलींचे वसतिगृह सहायक वसतिगृह अधीक्षिका १.
पहारेकरी १.