वैद्यकीय व अग्निशमन दलाच्या 'इतक्या' जागांसाठी पद भरती

वैद्यकीय व अग्निशमन दलाच्या 'इतक्या' जागांसाठी पद भरती

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात राज्य शासनाने (state government) नोकर भरतीवरील (Recruitment of employees) निर्बंध हटवल्याने

नाशिक महापालिकेने (Nashik Municipality) आरोग्यसह वैद्यकीय विभागातील (Medical Department) अठ्ठावीस संवर्गातील ३५८ व अग्निशमनच्या आठ संवर्गातील ३४८ असे एकूण ७०६ पद भरण्याची तयारी केली आहे. येत्या दहा दिवसात शासनाकडून भरतीबाबत मार्गदर्शक तत्व जारी होणार असून डिसेंबरमध्ये महापालिका प्रशासन भरतीप्रक्रिया (recruitment process) राबविणार आहे.

महापालिकेच्या उत्पन्नाचा विचार करता आस्थापना खर्च जास्त आहे. त्यामुळे मागील २४ वर्षांपासून महापालिकेत भरती प्रक्रिय‍ेला वेळोवेळी स्पीड ब्रेकर लागला. शासनाकडे प्रस्ताव पाठवून देखील भरतीची मागणी फेटाळण्यात आली. दुसरीकडे दरवर्षी सेवानिवृत्त (Retired) होणारे अधिकारी व कर्मचार्‍यांची संख्या पाहता अपुर्‍या मनुष्यबळावरच महापालिकेचा गाडा हाकला जात आहे.

मात्र शासनाच्या नव्या आदेशामुळे सरळ सेवेच्या कोट्यातील पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महापालिकेचा सुधारीत आकृतीबंध मंजूर झाला असल्याने सरळ सेवा कोट्यातील रिक्त पदे (vacancies) शंभर टक्के भरता येणार आहे. मनपात विविध विभागातील दोन हजार ६२९ सरळसेवेची पद रिक्त आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात आरोग्य व वैदयकीय तसेच अग्निशमन विभागातील (Fire Department) ७०६ पदांसाठी येत्या डिसेंबर महिन्यात भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com