राज्य लोकसेवा आयोगकडून 'गट क'साठी भरती

राज्य लोकसेवा आयोगकडून 'गट क'साठी भरती

नाशिक । प्रतिनिधी Nashik

पेपरफुटीमुळे (paper leak) स्पर्धा परीक्षेची (Competitive exams) तयारी करणारे विद्यार्थी (students) चिंतीत असले तरी परीक्षार्थींचा विश्वास असलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (Maharashtra Public Service Commission) वर्ग क साठी असलेल्या 900 जागांची जाहिरात (Advertising) आज प्रसिद्ध केली आहे. करोनाच्या (corona) महामारीनंतर प्रथमच एवढी मोठी भरती होत असल्याने परीक्षर्थीमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

राज्य शासनात अधिकारी आणि कर्मचार्‍यांची (Officers and staff) भरतीकरीता पात्रता स्पर्धा परीक्षा (Eligibility Competitive Examination) घेणार्‍या राज्य लोकसेवा आयोगाने (State Public Service Commission) महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा (Service Joint Pre-Exam) 2021 साठी 900 पदांकरीता जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

एमपीएससीकडून (MPSC) अधिकृत संकेतस्थळावर ’महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021’ साठी जाहीर करण्यात आलेल्या पदांमध्ये उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग (Department of Labor), गृह विभाग (Home Department), वित्त विभाग (Department of Finance), सामान्य प्रशासन विभागातील (General Administration Department) विविध जागांचा सामावेश आहे.

यामध्ये आयोगाणे प्रथमच उद्योग निरीक्षक (Industry Inspector) आणि तांत्रिक सहायक (Technical Assistant) या पदांचा समावेश केला आहे. तसेच लिपिक (Clerk) आणि कर सहायक (Tax assistant) या पदासाठी देखील प्रथमच टायपिंग चाचणी (Typing test) यामध्ये होणार आहे.

या जाहिरातीत प्रामुख्याने उद्योग निरिक्षक 103 पदे, एक्साईज विभाग दुय्यम निरिक्षक (Excise Department Deputy Inspector) 114 पदे, विमा संचलनालय तांत्रिक सहाय्यक (Directorate of Insurance Technical Assistant) 14 पदे, वित्त विभाग कर सहाय्यक (Finance Department Tax Assistant) 117 पदे, मंत्रालयीन लिपिक टंकलेखक (Ministry Clerk Typist) मराठीसाठी 473 पदे, लिपिक टंकलेखक इंग्रजीसाठी 79 पदे यांचा समावेश आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com