युपीएससीतर्फे वैद्यकीय सेवेतील ८३८ पदांसाठी भरती

असे असणार परीक्षेचे स्वरूप
युपीएससीतर्फे वैद्यकीय सेवेतील ८३८ पदांसाठी भरती

नाशिक | Nashik
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) वैद्यकीय सेवेतील परीक्षे (Medical Services Exams) संदर्भात सूचना पत्र जारी केले आहे. एमबीबीएस (MBBS) या वैद्यकीय शाखेतील पदवीधर उमेदवारांसाठी आयोगातर्फे परीक्षा घेतली जाणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांना २७ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज (Online Application) करण्यासाठी मुदत असेल.

तर दाखल केलेले अर्ज मागे घेण्यासाठी ३ ते ९ ऑगस्ट अशी मुदत दिली जाईल. ८३८ पदांसाठी ही भरती परीक्षा घेतली जाणार आहे. यापरीक्षेच्या माध्यमातून दिल्ली महापालिका स्तरावर (Delhi Municipal Corporation level) वैद्यकीय अधिकारी (Medical Officers) व रेल्वे विभागात निवड (Railway Department) केली जाणार आहे.

उपलब्ध जागा

गट एक मध्ये केंद्रीय आरोग्यसेवेत (Central Health Service) ज्युनिअर स्केल पोस्ट्सकरिता ३४९ जागा उपलब्ध आहेत. तर गट दोन अंतर्गत सहाय्यक विभागीय वैद्यकीय अधिकारी (रेल्वे) ३०० जागा, नवी दिल्ली महापालिकेत उपवैद्यकीय अधिकारी पाच जागा, तसेच पूर्व, उत्तर व दक्षिण दिल्ली महापालिका वैद्यकीय अधिकारी १८४ जागा उपलब्ध असतील.

परीक्षेचे स्वरूप

दोन टप्प्यात परीक्षा होणार आहे. पहिल्या टप्प्यात लेखी परीक्षा होईल. ही परीक्षा पाचशे गुणांसाठी असेल. प्रत्येकी अडीचशे गुणांचे दोन पेपर घेतले जातील. यासाठी प्रत्येक दोन तासांचावेळ असेल. चुकीच्या उत्तरासाठी गुणकपात लागू असेल. दुसऱ्या टप्यात व्यक्तिमत्त्व चाचणी साठी बोलविले जाईल. शंभरगुणांसाठी ही परीक्षा असेल.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com