सातपूर-गंगापूर भागात २५ लाखांची वसुली

सातपूर-गंगापूर भागात २५ लाखांची वसुली
USER

सातपूर । Satpur

मनपाच्या सातपूर विभागीय कार्यालयाच्या अंतर्गत असलेल्या व गंगापुर व सातपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राज्य शासन व नाशिक मनपाने निर्देशित केलेल्या लॉकडाऊन काळात कोविड १९ नियमांचे उल्लंघन केल्यामुळे कारवाई करून तब्बल २५ लाख रुपयांचा दंड पोलिस व मनपा प्रशासनाने वसुल केला आहे.

कोरोना बाधित व विनाकारण फिरणाऱ्या जनतेला कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचे गांभीर्य नसल्याने विविध कारणाने रस्त्यांवर येत आहेत. त्यामुळे वाढत्या प्रादुर्भावाला हे बेजबाबदार नागरिक कारणीभूत असल्याने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. यासाठी शासनाकडून दिलेल्या नियमांचे पालन करावे अती महत्वाच्या कारणाशिवाय घराबाहेर निघू नये असे आवाहन विभागीय आधिकारी नितीन नेर यांनी केले आहे.

दरम्यान सकाळी ११ ते पहाटे ६ वाजेपर्यंत गंगापुर व सातपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मनपाने संयुक्तपणे ठिकठिकाणी नाकाबंदी करुन कारवाईची मोहीम राबविण्यात आली. या कालावधीत विनाकारण फिरणाऱ्याची अँटीजन टेस्ट करण्यात आली. त्यात काही पॉझिटिव्ह सापडले. त्यांची कोविड केअर सेंटरला रवानगी करण्यात आली.

मास्क न लावता फिरणे, सामाईक अंतर न पाळणे, संचारबंदी चे उल्लंघन करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, रस्त्यावरील हातगाडी, टप उघड्या ठेवणे, ऑटो रिक्षा, खाजगी वाहन अशा विविध कारणांमुळे वाहन चालकांवर व नागरिकांवर कारवाई करण्यात आली. राज्य शासनाने लॉकडाऊन जाहीर केल्या पाऊसन ६ मे २०२१ पर्यंत विविध प्रकारच्या केसेस मध्ये सातपूर विभागीय कार्यालय, सातपूर व गंगापुर पोलिस ठाणे हद्दीत सुमारे २५ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

नागरिकांनी पोलीस प्रशासन व तसेच मनपा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे.

- नितीन नेर, सातपूर विभागीय आधिकारी

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com