नाशिक । Nashik

जिल्ह्यात पार पडलेल्या लोक अदालतीत 3 हजार 944 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला असून यात 25 कोटी, 89 लाख 70 हजार रूपयांची तडजोड करण्यात आल्याची माहिती जिल्हा विधी प्राधिकारणच्या वतीने देण्यात आली.

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशानुसार आज जिल्हाभरात लोकअदालतींचे नियोजन करण्यात आले होते. जिल्हा न्यायालयात प्रमुख न्यायाधिश अभय वाघवसे यांच्या हस्ते या लोक अदालतीचे उद्घाटन करण्यात आले.

दिवसभर विविध न्यायालयांमध्ये कोवीड 19 बाबतच्या सर्व नियमांचे पालन करून लोक अदालत पार पडली. या लोक अदालतीत जिल्हाभरातील प्रलंबीत प्रकरणांपैकी 7 हजार 310 प्रकरणे ठेवण्यात आली होती.

दावा पुर्व दाखल प्रकरणांमधील 20 हजार 246 प्रकरणे ठेवण्यात आली होती. कलम 138 ची 926, फौजदारी 387, बँकेची 71, मोटारवाहन 147, कामगार विषयक 4, कौटुंबिक वादाची 88, भुसंपादनाची 6 व दिवाणी 101 अशी 1 हजार 730 प्रकरणे यात निकाली निघाली. दावा दाखल पुर्व 2 हजार 214 प्रकरणे निकाली निघाली.

अशा प्रकारे एकुण 3 हजार 944 प्रकरणे निकाली निघाली, तर 25 कोटी 89 लाख 70 हजार 297 रूपयांच्या रकमेची तडजोड होऊन रक्कम वसुल करण्यात आले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव प्रसाद कुलकर्णी यांनी लोकअदालतीत सहभागी सर्व न्यायाधिश, अधिकारी, वकिल व पक्षकारांचे आभार मानले.