
संगमनेर । प्रतिनिधी Sangamner
फास्ट टॅगच्या (Fast Tag) नावाखाली टोलनाक्यावर स्थानिक नागरिकांकडून टोल वसुली (Toll Recovery) व कर्मचार्यांची दादागिरी या विरोधात आम्ही संगमनेरकरच्या बॅनरखाली बुधवारी (दि.8) हिवरगाव पावसा टोल नाक्यावर (Toll Naka) धडक दिली जाणार आहे.
गेली पाच वर्ष नूतनीकरणाचे काम चाललेला पुणे-नाशिक महामार्ग (Pune-Nashik Highway) 2017 साली 70 टक्के पूर्णत्त्वाच्या नियमावर टोल वसुलीसह सुरू झाला. अपुर्या कामांमुळे महामार्गावरील अपघातांमध्येही (Road Accident) मोठी वाढ झाली असून आत्तापर्यंत अनेक निष्पापांचे बळीही गेले आहेत.
यासाठी काही स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी आम्ही संगमनेरकर (Sangamner) या बॅनरखाली बुधवारी (ता.8) सकाळी 10 वाजता हिवरगाव पावसा टोलनाक्यावर धडक देण्याचा निर्णय घेतला असून स्थानिकांना मोफत प्रवासाची सुविधा असतांना सक्तिने टोल वसुली कशी केली जाते याचा जाब टोलनाका प्रशासनाला (Tolnaca Administration) विचारला जाणार आहे.
यावेळी पुणे-नाशिक महामार्ग रोखून ठिय्या आंदोलन करण्याचाही इशारा देण्यात आला असून ठेकेदार कंपनीने रस्त्याची अर्धवट राहिलेली सर्व कामे पूर्ण करावीत, संपूर्ण महामार्गाची दुरुस्ती करावी, बंद असलेले पथदिवे त्वरित सुरू करावेत व अपूर्ण राहिलेल्या उपरस्त्यांची (Service Road) त्वरित कामे पूर्ण करावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
हे आंदोलन राजकारण विरहित नागरिकांनी नागरिकांसाठी करण्याचा निर्णय घेतला असून या आंदोलनात प्रत्येक संगमनेरकराने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.