मध्य रेल्वेची विक्रमी मालवाहतूक

गतवर्षीच्या तुलनेत 35.6 टक्क्यांनी वाढ
मध्य रेल्वेची विक्रमी मालवाहतूक

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashik Road

मध्य रेल्वेत (Central Railway) सप्टेंबर 2021 मध्ये झालेली मालवाहतूक (Freight) आतापर्यंतची सर्वात चांगली लोडिंग आहे. मध्य रेल्वेने सप्टेंबर 2021 मध्ये 5.44 दशलक्ष टन मालवाहतूक केली. एप्रिल ते सप्टेंबरच्या पहिल्या सहामाही कालावधीत मध्य रेल्वेने 34.85 दशलक्ष टन लोड केले, जे मागील आर्थिक वर्षाच्या म्हणजेच 2020-21 मधील 25.71 दशलक्ष टनांच्या तुलनेत 35.6% वाढ नोंदवली आहे.

एप्रिल-सप्टेंबर 2021 या कालावधीत लोड होणार्‍या प्रमुख वस्तूंमध्ये कोळसा (Coal) 18.24 दशलक्ष टन, कंटेनर 4.79 दशलक्ष टन, सिमेंट (Cement) 3.47 दशलक्ष टन, लोह आणि स्टील (Iron and steel) 1.41 दशलक्ष टन, साखर (Sugar) 1.07 दशलक्ष टन, कांदा (Onion) 0.50 दशलक्ष टन आणि ऑटोमोबाईल (Automobile) 0.29 दशलक्ष टन यांचा समावेश आहे.

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी (Anil Kumar Lahoti, General Manager, Central Railway) म्हणाले की, रेल्वेने होणारी मालवाहतूक हा ग्राहकांसाठी उपलब्ध असलेली सुरक्षित, जलद आणि पर्यावरण अनुकूल पर्याय (Eco-friendly options) आहे. मध्य रेल्वे महसूल (Railway revenue) वाढवण्यासाठी सर्व शक्य मार्ग शोधत आहे.

पावसाळा असूनही मध्य रेल्वे टीमने मालवाहतूक लोडिंगला चालना देण्यासाठी सर्वोत्तम कामगिरी केली असल्याचे त्यांनी नमूद केले. बिझनेस डेव्हलपमेंट युनिट्सने (Business Development Units) मुंबई (Mumbai) विभागातून जिप्सम (Gypsum), अमोनिया गॅस (Ammonia gas), गॅल्वनाइज्ड स्टील कॉइल, मिल स्केल, कार्बन ब्लॅक फीड स्टॉक; नागपूर (Nagpur) विभागातून नट कोक, गुरूमार्केट, पुणे (Pune) विभागातून दर्शन, बांगलादेशकरीता साखरेची पहिल्यांदाच वाहतूक केली आहे.

अहमदनगर (Ahmadnagar), सोलापूर (Solapur) विभागातून मध्य रेल्वेच्या मालवाहतुकीत प्रथमच खताची लोडिंग केली. ज्यामुळे या अजोड कामगिरीला साहाय्य मिळाले. मध्य रेल्वेने जेएनपीटी येथून डिडब्लूएआरएफ कंटेनर ट्रेनचे लोडिंग सुरू केले आहे. यामुळे दुहेरी स्टॅक केल्यावर व्हॉल्यूम वाढण्यास मदत होईल.

तसेच स्पर्धात्मक खर्चाचा फायदा आणि अंतर्देशीय रसद कमीत कमी खर्चात पुरवता येते. सप्टेंबर महिन्यामध्ये मुंबई विभागाने 1.33 दशलक्ष टन, तर भुसावळ विभागाने 0.51 दशलक्ष टन, नागपूर विभागाने 2.96 दशलक्ष टन, पुणे 0.17 दशलक्ष टन आणि सोलापूरने 0.47 दशलक्ष टन लोडिंग साध्य केले आहे.

Related Stories

No stories found.