छगन भुजबळ
छगन भुजबळ |digi
नाशिक

गेल्या पाच महिन्यात राज्यात विक्रमी अन्नधान्य वाटप : छगन भुजबळ

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक | Nashik

राज्याच्या अन्न नागरी पुरवठा विभागाने गेल्या पाच महिन्यात विक्रमी अन्नधान्याचे वाटप केले आहे. सामान्य परिस्थितीमध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत महिन्यात साधारणतः ३.५० लाख मे.टन धान्य वितरीत केले जाते. मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक अडचणी असूनही आहे, त्याच यंत्रणेच्या माध्यमातून प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या ३.५० लाख मे.टन मोफत तांदूळाचे वितरण करण्यात आले आहे.

मे आणि जून पासून केशरी कार्डधारकांना देखील अतिरिक्त १.५० लक्ष मे.टन धान्य वाटप केले जात असल्याने प्रति माह जवळपास ८.५० लक्ष मे.टन म्हणजे तीनपट धान्य वितरीत करण्याचा विक्रम केला आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या पात्र ७ कोटी लाभार्थ्यांना एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत प्रतिव्यक्ती ५ किलो मोफत तांदूळ तसेच प्रति कुटुंब एक किलो तुरडाळ किंवा चनाडाळ वितरण करण्यात येत आहे.

आत्मनिर्भर योजनेंतर्गत रेशनकार्ड नसलेल्या गरीब व गरजू नागरिकांना माहे मे पासून ऑगस्ट पर्यंत प्रति व्यक्ती प्रतिमाह ५ किलो मोफत तांदूळ वितरण सुरू आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com