अंगणवाडी सेविकांना शासन कर्मचारी म्हणून मान्यता द्या; सीटू भवनातील मेळाव्यात एकमुखी मागणी

अंगणवाडी सेविकांना शासन कर्मचारी म्हणून मान्यता द्या; सीटू भवनातील मेळाव्यात एकमुखी मागणी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

अंगणवाडी सेविका (Anganwadi worker) व मदतनीस यांना शासकीय कर्मचारी (Government employees) म्हणून मान्यता मिळावी. तोपर्यंत त्यांना 26 हजार रुपये किमान वेतन मिळावे, पेन्शन आणि ग्रॅज्युटी (Pension and Graduation) मिळावी, अशी मागणी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मेळाव्यात सिटू भवन (Situ Bhavan) येथे करण्यात आली.

अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा सिटू भवन येथे मेळावा घेण्यात आला. अध्यक्षस्थानी सिद्धचे जिल्हाध्यक्ष सीताराम ठोंबरे होते. यावेळी अखिल भारतीय सीटूचे उपाध्यक्ष व महाराष्ट्र सिटूचे अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड (Vice President of All India CITU and President of Maharashtra CITU Dr. D. L. Karad) यांनी मार्गदर्शन केले.

अंगणवाडी सेविका (Anganwadi worker) व मदतनीस यांना शासकीय कर्मचारी (Government employees) म्हणून मान्यता मिळावी. तोपर्यंत त्यांना 26 हजार रुपये किमान वेतन मिळावे, पेन्शन आणि ग्रॅज्युईटी मिळावी, अश्या मागण्या या मेळाव्यात करण्यात आली.

यावेळी अंगणवाडी सेविकांच्या जिल्हाध्यक्ष सुलक्षणा ठोंबरे, सरचिटणीस कल्पना शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले. सुनीता मोगल यांनी आभार मानले. याप्रसंगी सुनीता मोगल, लता लावले, सुरेखा पवार, गौरी वैद्य, अंबाबाई गुंबाडे, कुसुम खोकरे, सुनीता कांबळी, लीला भोबे, वैशाली घुमरे, आदीसह अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com