महिला आरक्षणावर हरकती प्राप्त

महिला आरक्षणावर हरकती प्राप्त

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक महापालिका निवडणुकीच्या ( NMC Elections ) पार्श्वभूमीवर 31 मे रोजी काढण्यात आलेल्या महिला आरक्षणाच्या सोडतीवर (draw of women's reservation) आत्तापर्यंत एकूण चार हरकती ( Objections ) महापालिकेला प्राप्त झाल्या आहेत.

नाशिक महापालिकेच्या एकूण 133 जागांपैकी 67 जागा महिलांसाठी राखीव करण्यात आल्या आहेत. 31 मे रोजी सकाळी मुंबई नाका येथील महापालिकेच्या दादासाहेब गायकवाड सभागृहात महापालिका आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच प्रशासन उपायुक्त मनोज पाटील, नगर सचिव राजू कुटे, डॉ. आवेश पलोड आदी प्रमुख अधिकार्‍यांच्या उपस्थितीमध्ये महिला आरक्षण सोडत काढण्यात आली.

यावेळी अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती यांच्या देखील जागा राखीव करण्यात आल्या होत्या. त्याच्यावर हरकती मागवण्यात आल्या होत्या. त्यानुसार आजपर्यंत एकूण चार हरकती प्राप्त झाल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com