नामपूर l Nampur (प्रतिनिधी) :

उत्राणे गावाचा सर्वांगीण विकास करुन गावच्या जनतेने टाकलेला विश्वास सार्थ करा असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्रनाना पगार यांनी केले आहे.

बागलाण तालुक्यातील उत्राणे ग्रामपंचायतीची निवडणुक नुकतीच पार पडली. यात नामपुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिपक पगार यांच्या नेतृत्वाखालील पॅनलच्या सर्वच्या सर्व ८ जागा मोठ्या मताधिक्याने निवडुन आल्या आहेत.

या नवनिर्वाचीत ग्रामपंचायत सदस्यांचा सपत्नीक सत्कार गावचे भूमिपुत्र व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्रनाना पगार व त्यांच्या पत्नी संध्या पगार यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी पॅनल प्रमुख दिपक पगार, नवनिर्वाचीत ग्रामपंचायत सदस्य केदा पगार, कोमल पगार, रोहिदास आहिरे, आकाश पगार यांची भाषणे झाली.

निवडणुकीतील उणीदुणी काढत बसण्यापेक्षा सर्वांना सोबत घेऊन उत्राणे गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अहोरात्र प्रयत्नशील रहावे असे देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्रनाना पगार यावेळी बोलतांना सांगितले.

राज्य सरकारच्या माध्यमातून असलेल्या विविध योजना उत्राणे गावात राबविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून आपण सर्वत्तोपरी सहकार्य करु असेही राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्रनाना पगार यांनी यावेळी बोलताना सांगितले.

यावेळी नवनिर्वाचीत ग्रामपंचायत सदस्य केदा पगार, पुंजाराम पगार, योगिता पगार, हर्षदा पगार, अनुसया पगार, झेलाबाई बागुल, कोमल पगार, रोहिदास आहिरे आदींचा सत्कार करण्यात आला.

यावेळी सर्वश्री दादाजी पगार, लोटन पगार, सीताराम पगार, डोंगर पगार, बळीराम पगार, दिलीप पगार, मोठाभाऊ पगार, कारभारी पगार, डॅा. मोहन पगार, संजय पगार, संतोष पगार, प्रवीण पगार, जगदीश पगार, गणेश पगार, अशोक पगार, उत्तम भामरे, शेनाजी पगार, युवराज पगार, कारभारी बागुल, चंद्रकांत निकम, दिनकर पगार, शरद पगार, विनोद पगार, भाऊसाहेब पगार, रावसाहेब पगार, नितीन पगार, साहेबराव पगार, लोटन पगार, दादाजी पगार, सीताराम पगार, संतोष पगार, प्रवीण पगार, दिलीप पगार, दिनकर पगार, नितीन पगार, अनिल पगार, भाऊसाहेब पगार, प्रशांत पगार, उत्तम भामरे, रावसाहेब पगार, युवराज पगार, गणेश पगार, विरेंद्र पगार, शुभम पगार, दर्शन पगार, कविता पगार, लीलाबाई पगार, संध्या पगार, शकुंतला पगार, अंजली पगार, निकिता पगार, मनीषा अहिरे, कावेरी पगार आदींसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.