वाचनाने मनुष्य बनतो समृद्ध

जिल्हा परिषद सदस्या अमृता पवार यांचे प्रतिपादन
वाचनाने मनुष्य बनतो समृद्ध

सिन्नर। प्रतिनिधी Sinnar

वाचनाने (Reading) आनंद मिळतो, ज्ञानात (Knowledge) भर पडते, अद्ययावत माहिती मिळते, ताण-तणाव (Stress) कमी होतो. एकंदरीत वाचन माणसाला समृद्ध बनविते, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्या अमृता पवार (Amruta Pawar) यांनी केले.

सिन्नर महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाकडून आयोजित वाचन प्रेरणा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम (Dr. A.P.J. Abdul Kalam) यांची जयंती निमित्त महाविद्यालयात गुरुवार (दि.7) पासून वाचन सप्ताहाचे (Reading Week) आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्रचे संचालक हेमंत वाजे (MVP director Hemant Waje) होते.

विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे व वाचनाचे महत्त्व समजण्यासाठी महाविद्यालय स्तरावर अशा प्रकारचे उपक्रम घेणे ही खूप मोठी गोष्ट आहे. जास्तीत जास्त विद्यार्थी पुस्तकांपर्यंत पोहोचतील आणि अवांतर वाचनीय ग्रंथ कोणते याची त्यांना ओळख होण्यास मदत होईल. त्यामुळे ग्रंथालयांनी वाचन सल्ला केंद्र सुरू करावे असे पवार यांनी सांगितले.

प्राचार्य डॉ. पी. व्ही. रसाळ यांनी वाचन सप्ताह आयोजित करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला. वाचन संस्कृती जोपासणे, विद्यार्थांमध्ये (students) वाचनाची आवड निर्माण करणे, वाचनाचे महत्त्व सांगणे, काय वाचावे? का वाचावे? कसे वाचावे? यांसंदर्भात उपक्रमातून विद्यार्थ्यांना माहिती सांगितली जाणार असल्याचे रसाळ म्हणाले. वाचन सप्ताहाच्या नियोजनात ग्रंथ प्रदर्शन, अखंड वाचन दिन, वाचन संस्कृती, महाविद्यालयीन ग्रंथालय आणि वाचन साहित्य यावर दोन व्याख्याने व ‘वाचाल तर वाचाल’ या विषयावर एक दिवशीय राज्यस्तरीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.

सूत्रसंचलन वाय. एल. भारस्कर यांनी केले. प्रस्ताविक ग्रंथपाल डॉ. सुभाष अहिरे यांनी केले. सुधीर विधाते यांनी आभार मानले. यावेळी डॉ. एस. एन. पगार, बी. यू. पवार, ग्रंथालय सेवक मयूर बाजारे, उत्तम चव्हाणके, रामदास डावरे, केदारनाथ मवाळ, अरवींद घोलप, संजय बोर्‍हाडे, विशाल गुळे यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com