वाचन प्रेरणा दिन विशेष :  वाचाल तर वाचाल

वाचन प्रेरणा दिन विशेष : वाचाल तर वाचाल

नाशिक | प्रतिनिधी Nashik

भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम Bharat Ratna Dr. A.P.J. Abdul Kalamयांचा १५ ऑक्टोबर रोजी जन्मदिवस "वाचन प्रेरणा दिवस" Reading Inspiration Day म्हणून साजरा केला जातो.प्रबळ इच्छाशक्ती आणि प्रबळ आत्मविश्वास असलेले डॉ. कलाम यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू होते. गुळगुळीत मन आणि दयाळू स्वभावाचे त्याचे वैशिष्ट्य होते. त्यांनी देशातील तरुण पिढीला आपल्या विचारांनी आणि कृतीने भारावून टाकले होते. शक्य तितके साहित्य वाचावे आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी या दृष्टीने शाळा आणि महाविद्यालयांमध्ये वाचन प्रेरणा दिन आयोजित केला जातो.

आज कोरोना माहामारीतून हळूहळू बाहेर पडत शाळां पाठोपाठ महाविद्यालय सुध्दा सुरू होणार आहेत. यांचं दरम्यान आलेला वाचन प्रेरणा दिन .कित्येक दिवस शाळा महाविद्यायांसोबत ग्रंथालय सुद्धा या काळात बंद होती. याशिवाय अनेक सरकारी खाजगी वाचनालय सुद्धा बंद होती. काही या आधीच टप्प्या टप्प्याने उघडण्यात आली आहे.

दरम्यान या मधल्या काळात वाचन ही गरज असलेल्या अनेक स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थिनीचे वाचनालय बंद असल्याने हाल झाले. आणि दुसरीकडे आधीच वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे अशी बोंब असताना त्यात इतक्या प्रदीर्घ काळ बंद असलेल्या वाचनालय, ग्रंथालयांमुळे वाचन करण्याची लोकांची आवड आणि सवय मोडली गेली का असा प्रश्न पडतो.

परंतु या नव्या तंत्रज्ञानाच्या युगात डिजिटल स्वरूपात, ऑनलाईन पद्धतीने बऱ्यापैकी पुस्तकांची डिजिटल ग्रंथालय आज उपलब्ध आहेत.त्यामुळे वाचक वर्ग संपला आहे म्हणण्याऐवजी त्याच्या वाचनाच्या साधनात बद्दल झाला आहे असं म्हणावं लागेल. लोकं चालता, बोलता, फावल्या वेळेत हातातच चोवीस तास डिजिटल स्वरूपात ज्ञानाचा खजिना उलगडत असतात. आता एखादया खिडकीपाशी , कोणत्या शांत ठिकाणीं झाडाखाली बसून निवांत पुस्तकं घेवुन वाचण्याची पध्दत जुनी झाली असेल तरी वाचक काहीं तरी वाचता आहेत त्याला महत्त्व आहे.

नवीन तंत्रज्ञानाच्या युगात डिजिटल माध्यमातून वाचन साहित्य उपलब्ध आहेत. पण बरेचदा मोबाईल वर हे साहित्य वाचतांना लक्ष विचलित करणारी इतर अनेक मेसेजेस येतं असतात. अशा वेळी प्रत्यक्ष स्वरूपात उपलब्ध ग्रंथ , साहित्य वाचन्याच्या दृष्टीने आजही तितक्याच प्रमाणात प्रभावी आहे.त्यासाठी सार्वजनिक वाचनालय नाशिक ही वाचन संस्कृती चा मोठा वारसा आहे. नुकतीच विभागाची नवीन स्वरूपात पुनर्रचना करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने अनेक पुस्तकांची विपुल ग्रंथ संपदा वाचनासाठी उपलब्ध आहेत.

- देवदत्त जोशी(सावाना ,ग्रंथसचिव)

संस्कृतीत म्हटले आहे की वाचाल तर वाचाल आणि ज्या व्यक्तीची वाचन आवड, प्रेरणा असेल तर तो व्यक्ती चौफेर व्यक्तिमत्वाची छाप नक्कीच पाडू शकतो.कारण केलेल वाचन, त्यातुन मिळालेल ज्ञान हे आयुष्यात कायम प्रेरणादायी ठरत. पूर्वीच्या काळी अनेक वाचनालय होती. अनेक जन ग्रंथालयात जाऊन वाचन करायची , आता सोशियल मीडिया , डिजिटल माध्यमातून का होईना वाचन संस्कृती ची जोपासना झाली पाहिजे. मला स्वतःला ही वाचनाची खुप आवड आहे. लहानपणीच वडिलांकडून त्याचं बीज रोवल गेलं होत. आज त्या चांगल्या सवयीची वेळोवेळी मदत होते.

- वाचन प्रिय आमदार राहुल ढिकले.

वाचन प्रेरणा दिनानिमित्त असे विविध उपक्रम शालेय, महाविद्यालय, वाचनालय स्तरावर घेण्यासारखे अनेक उपक्रम-

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम वाचन गट तयार करणे

सामुदायिक सहभागातून शाळेत बुक बँक तयार करावी.

पुस्तक भेट म्हणून हा उपक्रम राबवावे.

प्रत्येक व्यक्ती, शिक्षक, माजी विद्यार्थी, पालक यांनी विद्यार्थी किंवा शाळेला पुस्तके द्यावी जी विद्यार्थ्यांच्या वयाला अनुरूप असेल.

विद्यार्थ्यांना वाचण्याचा आनंद घेता यावा यासाठी 'वाचू आनंदे' सारख्या वर्गाचे आयोजन करावे.

चांगल्या पुस्तकांवर चर्चासत्रांचे आयोजन व्हावे.

पुस्तक प्रदर्शनांचे आयोजन

ऑनलाईन शिक्षणाच्या काळात वाचन संस्कृती वाढवण्यासाठी ऑनलाईन वाचन स्पर्धा आयोजित केले पाहिजेत.

कमीतकमी ऑनलाइन स्वरूपात तरी एक पुस्तकं वाचण्याचा संकल्प केला पाहिजे .

व्हॉट्सअॅप, इंटरनेट, फेसबुक, ट्विटर सारख्या सोशल मीडियाने वाचन संस्कृती वाढेल , वाचनाला प्रेरणा मिळेल असा संदेश पसरवला पाहिजे.

सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी वाचन प्रेरणा दिनानिमित्त मराठी प्रचार / वाचन / वाचन संस्कृतीच्या विकासासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे.

Related Stories

No stories found.