नाशिकरोड । प्रतिनिधी

शिवसेनेचा महापौर होण्यासाठी आगामी महापालिकेच्या निवडणुकीमध्ये नाशिकरोड विभागात सर्वच्या सर्व नगरसेवक शिवसेनेचे निवडून आणा. त्यासाठी शिवसैनिकांनी जोमाने काम करून शिवसेनेचे सामाजिक कार्य जनतेपर्यंत पोहोचवा, भुतकाळाबद्दल न बोलता वर्तमान सांभाळल्यास भविष्यकाळाची चिंता करण्याची गरज पडत नाही. त्यानुसार मागे काय झाले ते विसरुन आता कामे चांगले केले तर भविष्यात महापालिकेचा महापौर हा शिवसेनेचा असेल.

सोशल मिडीयामार्फत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व शिवसेनेच्या कामाची माहिती पोहचवा, असे प्रतिपादन महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केले. याप्रसंगी माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड आपल्या भाषणात म्हणाले की, आगामी महापालिकेची निवडणूक महत्त्वाची असून महापालिकेवर कुठल्याही परिस्थितीत भगवा फडकला पाहिजे. त्यासाठी आत्तापासूनच सर्वांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहनही त्यांनी केले.

नाशिकरोड शिवसेनेच्या वतीने नवनिर्वाचित महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा सत्कार सोहळाप्रसंगी सत्काराला उत्तर देतांना बोलत होते. महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा सत्कार खा. हेमंत गोडसे, प्रभाग सभापती जयश्री खर्जुल यांचे हस्ते झाले. यावेळी माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, माजी आमदार योगेश घोलप, माजी महौपार नयना घोलप, नगरसेविका सत्यभामा गाडेकर, मंगला आढाव, ज्योती खोले, सुनिता कोठूळे, सुर्यकांत लवटे, रमेश धोंगडे, केशव पोरजे, प्रशांत दिवे, जगदिश पवार,

सुनिल गोडसे, नितीन चिडे, सुधाकर जाधव, योगेश देशमुख, नितीन खर्जुल, किरण डहाळे, गोरख खर्जुल, विकास गिते, चंदु महानुभव, योगेश देशमुख, स्वप्निल औटे, प्रमोद शिंदे, शेखर पवार, ओमकार गवळी, कुमार पगारे, दिपक टावरे, विक्रांत थोरात, राकेश कोठूळे, मसूद जिलानी, शिवा ताकाटे, विक्रम खरोटे, श्रीकात मगर, अशोक जाधव, स्वप्निल शहाणे, शाम खोले, योगेश नागरे, मंदा गवळी, संजय गायकवाड, पवन महाले, राहुल चटोले, भुषण ताजनपुरे, उत्तम कोठूळे, दिंगबर डबे, विश्वास तांबे, अभिजित धोंगडे, सागर भोजने, समर्थ मुठाळ, राहुल वाजे, गणेश बनकर, संकेत लासुरे, कुलदिप जाधव, सागर गायकवाड, निलेश कर्डिले, सागर बारगळ आदी उपस्थित होते.