फेरमतदानाचे आदेश; मतमोजणी स्थगीत

फेरमतदानाचे आदेश; मतमोजणी स्थगीत

सटाणा । प्रातिनिधी | Satana

सटाणा मर्चंटस को -ऑप. बँकेच्या (Satana Merchants Co-op. Bank( पंचवार्षिक निवडणुकीसाठी (election) झालेल्या मतदान प्रक्रियेत (Voting process) केंद्र चारच्या बूथ क्रमांक दोनवरील मतमोजणीला (Counting of votes) सिद्धिविनायक पॅनलच्या वतीने आक्षेप घेण्यात आल्याने

पुणे (pune) येथील राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणातर्फे (State Co-operative Electoral Authority) स्थगिती देण्यात आली आहे. रविवार दि. 26 जूनरोजी सदर केंद्रावर फेरमतदान घेऊन सोमवार दि. 27 जूनरोजी मतमोजणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी सुजय पोटे (Returning Officer Sujay Pote) यांनी मतदान केंद्रात (Polling station) चौकशी केली असता, मतदारांना अनुसूचित जाती-जमातीच्या आठ मतपत्रिका जास्त व इतर मागास वर्गाच्या आठ मतपत्रिका कमी देण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.

याबाबत पोटे यांनी पुणे (pune) येथील प्राधिकरणाला अहवाल पाठविल्यानंतर उपरोक्त निर्णय जाहीर करण्यात आला. प्रशासकीय यंत्रणेच्या कामातील त्रुटींमुळे उमेदवार व समर्थकांचा मात्र हिरमोड झाला आहे. समको बँकेसाठी रविवारी (दि. 19) 74.72 टक्के मतदान होऊन काल (दि. 20) सकाळी 8 वाजता मतमोजणी होणार होती

मात्र केंद्र क्र. 4 मधील बुथ क्र. 2 मध्ये मतपत्रिकांचा घोळ आढळून आल्याने विरोधी सिध्दीविनायक पॅनलतर्फे मतमोजणीस आक्षेप घेण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनीही झालेली चूक मान्य करत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडे अहवाल पाठविला होता. सायंकाळी प्राधिकरणातर्फे उपरोक्त निर्णय देण्यात आला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com