आरटीई प्रवेशासाठी पुन्हा मुदत वाढ

९ जुलै पर्यंत घेता येतील प्रवेश
आरटीई प्रवेशासाठी पुन्हा मुदत वाढ

नाशिक | Nashik

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम’नुसार खासगी विनाअनुदानित किंवा कायम विनाअनुदानित किंवा स्वयंअर्थसहाय्यता शाळांमध्ये वंचित व दुर्बल घटकातील मुलांसाठी प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात.

२०२०-२१ शैक्षणिक वर्षासाठी १७ मार्चला आरटीईची सोडत (RTE Lucky Draw) काढण्यात आली होती. मात्र, करोना परिस्थितीमुळे प्रवेश प्रक्रिया आद्यपही पुर्ण झाली नाही.त्यात पुन्हा ओटीपीच्या तांत्रिक अडचणीमुळे (OTP Technical Problem) उर्वरीत प्रवेश निश्‍चित (Admission Process) करण्यासाठी आत ९ जुलै पर्यंत मुदतवाढ( Re Extension) देण्यात आली आहे.

प्रवेश प्रक्रिया ११ जुन पासुन नव्याने सुरु झाली होती .अखेरची तारीख ३०जुन असुनही निवड झालेल्या ४२०८ विद्यार्थ्यांपैकी फक्त 1521 विद्यार्थ्यांचेच प्रवेश (Students Admission) पुर्ण झालेत. राहीलेल्रे 2687 आणि प्रतिक्षायादीतील (Admission Waiting List) प्रलंबित प्रवेश पाहात ही मुदत वाढ देण्यात आली आहे.

ज्या पालकांना अजुनही लॉटरी लागल्याचे कळले नाही त्यांना एसएमएस करुन प्रवेश घेण्यासाठी कळवावे तसेच पालकांनीही शाळा स्तरावर कागदपत्रांची प्राथमिक पडताळणी करून पडताळणी समितीच्या मान्यतेने प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावेत, असे आदेश शिक्षण संचालकांनी दिले आहेत.

असे झालेत प्रवेश...

एकुण शाळा-९४३२

जागा-९६६८४

एकुण अर्ज-२२२५८४

निवड झालेले अर्ज-८२१२९

निश्‍चित झालेले प्रवेश-22664

नाशिक जिल्ह्यातील शाळा -४५०

जागा-४५४४

आलेले अर्ज-१३३३०

निवड झालेले अर्ज-४२०८

निश्‍चित झालेले प्रवेश-1521

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com