आरटीई प्रवेशासाठी पुन्हा मुदतवाढ

आरटीई प्रवेशासाठी पुन्हा मुदतवाढ

नाशिक । प्रतिनिधी Nashik

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार ( RTE )अधिनियमानुसार खासगी विनाअनुदानित किंवा कायम विनाअनुदानित किंवा स्वयंअर्थसहाय्यता शाळांमध्ये वंचित व दुर्बल घटकातील मुलांसाठी प्रवेश ( RTE Admissions ) स्तरावर 25 टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात.

2020-21 शैक्षणिक वर्षासाठी 17 मार्चला आरटीईची सोडत काढण्यात आली होती. मात्र, करोना परिस्थितीमुळे प्रवेशप्रक्रिया अद्यापही पूर्ण झाली नाही.त्यात पुन्हा ओटीपीच्या तांत्रिक अडचणीमुळे उर्वरीत प्रवेश निश्चित करण्यासाठी आत 9 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

प्रवेश प्रक्रिया 11 जूनपासून नव्याने सुरु झाली होती .अखेरची तारीख 30जुन असूनही निवड झालेल्या 4208 विद्यार्थ्यांपैकी फक्त 1521 विद्यार्थ्यांचेच प्रवेश पुर्ण झालेत.राहिलेले 2687 आणि प्रतीक्षायादीतील प्रलंबित प्रवेश पाहता ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

ज्या पालकांना अजुनही लॉटरी लागल्याचे कळले नाही त्यांना एसएमएस करून प्रवेश घेण्यासाठी कळवावे तसेच पालकांनीही शाळा स्तरावर कागदपत्रांची प्राथमिक पडताळणी करून पडताळणी समितीच्या मान्यतेने प्रवेशप्रक्रिया पूर्ण करावेत,असे आदेश शिक्षण संचालकांनी दिले आहेत.

असे झालेत प्रवेश...

एकूण शाळा -9432

जागा -96684

एकूण अर्ज -222584

निवड झालेले अर्ज -82129

निश्चित झालेले प्रवेश -22664

जिल्ह्यातील शाळा - 450

जागा -4544

आलेले अर्ज -13330

निवड झालेले अर्ज -4208

निश्चित झालेले प्रवेश -1521

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com