पॉलिटेक्निक प्रवेशासाठी पुन्हा मुदत वाढ

पॉलिटेक्निक प्रवेशासाठी पुन्हा मुदत वाढ
प्रवेश परीक्षा

नाशिक | Nashik

पॉलिटेक्निक प्रवेशासाठी (Polytechnic Admission) विद्यार्थ्यांना संधी मिळावी यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाकडून (Directorate of Technical Education) वारंवार मुदतवाढ दिली जात आहे.

दहावीनंतरच्या तंत्रशिक्षण पदविका अभ्यासक्रम (Diploma Course in Technical Education) अर्थात पॉलिटेक्निक डिप्लोमा (Polytechnic Diploma) प्रथम वर्ष प्रवेशाला आतापर्यंत तीन ते चार वेळा मुदतवाढ देण्यात आली असून, पुन्हा एकदा सुधारित वेळापत्रक (Timetable) जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना आता येत्या २७ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन प्रवेश अर्ज (Online Entrance Exam) करता येईल.

तर अंतिम गुणवत्ता यादी (Final Meirt list) ४ सप्टेंबर जाहीर होणार आहे. शहरातील महाविद्यालयांत विद्यार्थ्यांसाठी सुविधा केंद्र (Convenience Center) सुरू करण्यात आले आहे.

राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (State Board of Secondary Education) दहावीचा निकाल (10th Results) जाहीर झाल्यानंतर अकरावीसह वेगवेगळ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रिया (11th Admission Process) सुरू झाल्या आहेत. तसेच सीबीएसईतर्फेही (CBSE) दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला असून या विद्यार्थ्यांनाही अकरावी व इतर पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी संधी उपलब्ध झाली आहे.

पॉलिटेक्निक डिप्लोमा प्रथम वर्ष प्रवेश अर्ज करण्यासाठी २० ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती. या विहित मुदतीत पुन्हा वाढ करण्यात आली असून इच्छुक विद्यार्थ्यांना २७ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येईल.

नाशिकमधील २५ पॉलिटेक्निक महाविद्यालयांत विविध विद्याशाखांच्या ९२५४ जागा उपलब्ध असून त्यासाठी सुमारे पाच ते सहा हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहेत.

ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून अर्ज निश्चित केले नाही, त्यांनी अर्ज निश्चित करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. तसेच ज्या विद्यार्थ्यांना अर्ज करावयाचे आहे, त्यांना संधी उपलब्ध असून विहित मुदतीत अर्ज करावे, आवाहनही करण्यात आले आहे. प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी http://poly21.dtemaharahstra.gov.in/diploma21/ या संकेतस्थळास भेट द्यावी.

सुधारित वेळापत्रक

  • २७ ऑगस्ट : ऑनलाइन प्रवेश अर्ज करण्याची अंतिम मुदत.

  • ३० ऑगस्ट : तात्पुरती गुणवत्ता यादी होईल जाहीर.

  • ३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबर : गुणवत्ता यादीतील त्रुटी व कागदपत्रांची पूर्तता करणे.

  • ४ सप्टेंबर : अंतिम गुणवत्ता यादी होईल जाहीर.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com