अंबादास खैरे, शहराध्यक्ष
अंबादास खैरे, शहराध्यक्ष
नाशिक

राष्ट्रवादी युवक शहराध्यक्षपदी अंबादास खैरे यांची फेरनिवड

राष्ट्रवादी युवक काँग्रेसची नवीन शहर कार्यकारिणी जाहीर

Vijay Gite

Vijay Gite

नाशिक । Nashik

नाशिक राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी अंबादास खैरे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. नाशिक शहर युवक कार्यकारिणी माजी खासदार समीर भुजबळ, शहराध्यक्ष रंजन ठाकरे व युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी जाहीर केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मजबुतीसाठी नवीन कार्यकारिणीत कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांना पदभार दिला असून सामाजिक कार्यासोबत पक्षवाढीसाठी सक्रीय असलेल्यांना यात संधी देण्यात आली आहे. नवीन कार्यकारिणीत सक्रीय व जोमात काम करीत असलेल्या कार्यकर्त्यांना स्थान देणार आले आहे.

युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख व स्थानिक नेत्यांशी विचारविनिमय करून माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली व शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने सर्वसमावेशक नाशिक शहर युवक कार्यकारिणी जाहीर करण्यात आल्याचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी सांगितले.

आगामी महानगरपालिका निवडणुक लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. जे कार्यकर्ते आपल्या वार्डात किंवा विभागात चांगले काम करतात अशा एकनिष्ठ कार्यकर्त्यास जबाबदारी देण्यात आली आहे.

नाशिक राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शहर कार्यकारिणीत सहा उपाध्यक्ष, सहा सरचिटणीस, सहा चिटणीस, सहा संघटक हि पदे असून तीन विधानसभा अध्यक्ष व सहा विभागीय अध्यक्षांची निवड कार्यकारिणीत करण्यात आल्याचे युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी सांगितले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com