रजा अ‍ॅकेडमी कार्यालयाची झडती

पत्रके-कागदपत्रे पोलिसांकडून जप्त
रजा अ‍ॅकेडमी कार्यालयाची झडती

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

त्रिपुरातील (Tripura) कथित अत्याचार घटनांच्या निषेधार्थ शहरात रजा अ‍ॅकेडमी संघटनेतर्फे ( raza academy association) पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान दगडफेक (stone pelting), तोडफोड, प्राणघातक हल्ले आदी हिंसाराचे प्रकार घडल्याने या घटनांची गंभीरतेने दखल घेत पोलिसांनी इस्लामपुरा भागातील लल्ले चौकातील संघटनेच्या कार्यालयावर रात्री छापा (raid) मारला. पंचासमक्ष कुलूप तोडण्यात येवून कार्यालयाची कसून झडती घेण्यात आली.

यावेळी काही पत्रके (latter), संगणक (computer) व इतर दस्तावेज मिळून आल्याने ते पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, मालेगाव (malegaon) दंगल (Riot) प्रकरणी आज 3 जणांना ताब्यात घेण्यात आल्याने अटक झालेल्या संशयितांची संख्या 52 वर जावून पोहचली आहे. परवा अल्पसंख्यांक मंत्री (Minister for Minorities) नवाब मलिक (Nawab Malik) यांनी मुंबई (mumbai) येथील रजा अ‍ॅकेडमीच्या कार्यालयात भाजप (bjp) नेते आशिष शेलार यांनी भेट देत बैठक घेतल्याचा आरोप केला होता. मालेगाव पोलिसांनी स्थानिक कार्यालयावर छापा टाकल्याने ही कारवाई शहरात चर्चेचा विषय बनली आहे.

दरम्यान, बंदच्या पार्श्वभूमीवर सोशल मिडियावरून (Social media) जातीय तेढ निर्माण करणारे प्रक्षोभक व्हीडीओ (video) चित्रफित व्हायरल (viral) केल्याप्रकरणी अम्मार अन्सारी यास पोलिसांनी अटक केली आहे. त्रिपुरातील मुस्लीमांवर झालेल्या कथित अत्याचाराचे निषेधार्थ येथे रजा अ‍ॅकेडमी व सुन्नी जमेतुल उलमा (Sunni Jameetul Ulama) या संघटनांतर्फे शुक्रवारी पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये सायंकाळी हिंसक घटना संतप्त जमावातर्फे केल्या गेल्याने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर परवा रात्री उशीरा रजा अ‍ॅकेडमीच्या इस्लामपुरा भागातील लल्ले चौकातील मुख्य कार्यालयावर उपअधिक्षक लता दोंदे यांच्यासह पोलीस पथकाने छापा टाकला. संघटनेचे पदाधिकारी मदत करत नसल्याने पंचासमक्ष कार्यालयाचे कुलूप तोडण्यात येवून पोलिसांनी आत प्रवेश करीत झडती घेतली. यावेळी बंदचे आवाहन करणारी पत्रके तसेच इतर दस्तावेज व कागदपत्रे पोलिसांतर्फे जप्त करण्यात आली आहेत.

मालेगाव बंदला लागलेले हिंसक वळण तसेच अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी काल भाजप नेते अशिष शेलार यांनी भेट देत तिथे बैठक झाल्याचा आरोप केला होता या पार्श्वभूमीवर मालेगावी पोलिसांनी रजा अकादमीच्या लल्ले चौकातील कार्यालयावर रात्री छापा मारून पंचासमक्ष कार्यालयाचे कुलूप जबाबदार पदाधिकारी न आल्याने तोडण्यात येऊन झडती सत्र राबवले गेले. पोलीस उपअधीक्षक लता दोंदे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई केली. यावेळी पोलिसांना काही पत्रके, संगणक व दस्तऐवज मिळून आल्याने ते पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मालेगाव मध्य आ. मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी धार्मिक संघटना व राजकीय पदाधिकार्‍यांना पोलिसांतर्फे लक्ष्य केले जात असल्याचा आरोप काल पत्रकारांशी वार्तालाप करतांना केला होता. त्यामुळे पोलिसांनी राजकीय दबावाखाली कारवाई थांबवू नये, अशी मागणी जनतेकडून केली जात असतांनाच काल रात्री थेट रजा अ‍ॅकेडमीच्या कार्यालयावर छापा मारत केलेली कारवाई पोलिसांवर कुठलाही दबाव नसल्याचे संकेत देणारी ठरली आहे.

सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, प्राणघातक हल्ले, जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न या प्रकरणी दाखल गुन्ह्यात पुरावे तपासून पोलिसांतर्फे अटकेची कारवाई केली जात आहे. कुणावरही आकस ठेवून कारवाई करण्याचा प्रश्नच येत नसल्याचे स्पष्टीकरण अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी पत्रकारांशी बोलताना दिले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com