त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त गुरुवारी रथोत्सव

त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त गुरुवारी रथोत्सव

त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी | Trimbakeshwar

त्र्यंबकेश्वर येथे त्रिपुरी पौर्णिमानिमित्त (tripuri purnima) रथोत्सव 18 नोव्हेंबरला आयोजित करण्यात आला आहे. यावेळी गावातून रथ मिरवणूक काढून देवीला भातबळी देण्यात येणार आहे...

गेल्या वर्षी करोनामुळे (Corona) त्र्यंबकचा रथोत्सव (Rathotsav) झाला नाही. मूर्ती स्पर्श करून पालखी काढण्यात आली होती. त्रिपुरासुर नामक राक्षसाचा भगवान शंकरांनी वध केल्यानंतर देवलोकात आनंंदोत्सव साजरा करण्यात आला. या आख्यायिकेला अनुसरून येथे रथोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे.

गुरुवारी दुपारी त्र्यंबकेश्वराची पालखी व भव्य लाकडी रथ मिरवण्यात येईल. पेशव्यांचे सरदार विंचूरकर यांनी त्र्यंबकेश्वराच्या चरणी रथ अर्पण केलेला आहे. दीडशे वर्षांपूर्वीचा हा रथ आहे. लाकडी रथावर नवग्रह अष्टदिक्पाल देवी-देवतांच्या मूर्ती असून कलात्मक कोरीव काम केलेले आहे.

दुपारी साडेतीन वाजता त्र्यंबकेश्वर मंदिरातून हा रथ निघेल. रथामध्ये त्र्यंबकेश्वरांची पंचमुखी सोन्याची मूर्ती ठेवली जाईल.रथाचे सारथ्य करण्यासाठी असलेल्या जागेवर ब्रह्मदेवाची मूर्ती ठेवली जाते. साक्षात भगवान शंकरांचा रथ सृष्टीकरता ब्रह्मदेव ओढत आहे , अशा आध्यात्मिक भावनेने रथ निघतो.

बैलांच्या सहा जोड्या हा रथ ओढतात. सोबत त्र्यंबकेश्वराची पालखी असते, त्याच देवाच्या पादुका असतात. रथ कुशावर्त तीर्थावर आल्यानंतर भगवान त्र्यंबकेश्वराच्या मूर्तीला गोदावरी जलाने अभिषेक स्नान घातले जाते. येथून परत मेनरोड मार्गे रथ पालखी त्र्यंबकेश्वर मंदिरात येते.

या रथाला आकर्षक नेत्रदीपक विद्युत रोषणाई तसेच फुलांची रोषणाई केलेली असते. नगरीतील विविध मंडळे पालखी मार्गात फुलांची सजावट करतात रांगोळी काढतात. भाविक पुष्पवृष्टी करीत असतात. हजारो शिवभक्त शिवाचा जय जय कार करीत शंखनाद करीत, धार्मिक वाद्यवृंद पालखी रथ फटाक्यांची आतिषबाजी अशी वाटचाल मिरवणुकीत सुरू असते.

त्र्यंबकेश्वर मंदिरात पालखी परत आल्यानंतर मंदिरातील दीपमाळ त्रिपुरी पौर्णिमा वातीने पेटवली जाते प्रज्वलित केली जाते. याला देव दिवाळी म्हणतात व पणती दिवाळी दिवाळी सणाची सांगता होते.

दि.19 नोव्हेंबर रोजी शुक्रवारी ग्रामदेवता महादेवी भात बळी अर्पण केला जाणार आहे. गावकर्‍यांनी जमवलेला तांदूळ कुशावर्त (kushavarta) तीर्थावर गोदावरी जलाने शिजवला जातो. तिथे बैलगाडीत भात ठेवून त्यावर टेंबा, मशाल दिवा लावून प्रसंगी बैलगाडी रेडा आणि बैल यांनी ओढून मिरवणुकीने ग्रामदेव ता महादेव महादेवीस भात बळी अर्पण केला जातो.

वैकुंठ चतुर्दशीची महापूजा त्र्यंबकेश्वर मंदिरात 17 रोजी मध्यरात्री होईल. त्यात मध्यरात्री विष्णू शिवपूजन होईल त्यानंतर विष्णूपूजन होईल. त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टकडून मिरवणुकीचे नियोजन सुरू आहे. तसेच शासनाच्या नियमावलीचेही मार्गदर्शन घेण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com