रतन इंडिया औष्णिक वीजप्रकल्प होणार सुरु; मंत्रालयातील बैठकीत घेतलागेला 'हा' महत्वाचा निर्णय

रतन इंडिया औष्णिक वीजप्रकल्प होणार सुरु; मंत्रालयातील बैठकीत घेतलागेला 'हा' महत्वाचा निर्णय

सिन्नर । प्रतिनिधी | Sinnar

येथील रतन इंडिया प्रकल्पातून (Ratan India Project) वीजनिर्मितीसाठी (Power generation) आमदार माणिकराव कोकाटे (MLA Manikrao Kokate) यांनी सुरू केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. या ठिकाणाहून लवकरच 540 मेगावॉट इतकी वीजनिर्मिती (Power generation) होणार आहे.

मंत्रालयात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्या दालनात दोन वेळेला ऊर्जा मंत्री (Minister of Energy) व संबंधित विभागाच्या सचिव व इंडिया बुल्सचे कार्यकारी अधिकारी (Executive Officer of India Bulls) यांच्या उपस्थितीत सिन्नर तालुक्यातील (sinnar taluka) गूळवंच येथील रतन इंडियाचा औष्णिक वीजप्रकल्प (Ratan India's thermal power plant) सुरु करण्यासाठी कोकाटे यांच्या मागणीवरुन बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत आमदार कोकाटे यांनी 1350 मेगावॉटचा औष्णिक वीज प्रकल्प (Thermal power projects) सुरु झाला तर या भागात रोजगाराच्या संधी वाढण्याबरोबरच 20किमी परिघातील शेतकर्‍यांना 24 तास वीजपुरवठा होऊ शकतो अशी माहिती देत हा वीज प्रकल्प सुरु करण्याची मागणी लावून धरली. ना. पवार यांनी महाजनकोच्या अधिकार्‍यांना ह्या प्रकल्पातून वीजनिर्मिती करण्याच्या सुचना केल्या. ह्या बैठकीनंतर कोकाटे यांनी रतन इंडियातून वीजनिर्मिती होण्यासाठी विविध अधिकार्‍यांच्या भेटी घेऊन सातत्याने पाठपुरावा केला.

आ. कोकाटे यांच्या आग्रहाखातर महाजनको (MAHAGENCO) व महाराष्ट्र शासनाने (government of maharashtra) केंद्र सरकारच्या (central government) ऊर्जा विभागाकडे (Department of Energy) यात लक्ष घालण्याची मागणी केली होती. त्यानुसार केंद्र सरकारचे एनटीपीसी पथक (NTPC Squad) गेल्या 3 दिवसांपासून येथील रतन इंडिया प्रकल्प व परिसराची पाहणी करत आहे.

रेल्वे मार्ग (Railway line), रस्ते मार्ग यांद्वारे होणारी कोळसा वाहतूक ही सोईस्कर होणार असल्याने या प्रकल्पाबाबत अनुकूलता दर्शवित त्यांनी केंद्र सरकारला तात्काळ अहवाल पाठवला आहे. केंद्रीय ऊर्जा मंत्री आर. के. सिंह यांनीही त्यासाठी सकारात्मकता दर्शविली आहे. प्रत्येकी 270 मेगावॉटचा एक असे 540 मेगावॉटचे दोन युनिट सुरु होणार असून 540 मेगावॉट वीजनिर्मिती करण्यासाठी विकासक मिळाला आहे. त्यामुळे उर्वरित कामे होऊन महाराष्ट्र शासन व केंद्र सरकारच्या एनटीपीसी विभागाच्या माध्यमातून वीजनिर्मिती होण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत.

उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे झालेल्या बैठकीसाठी रतन इंडिया प्रकल्पाचे मालक राजीव रतन (Rajiv Ratan, owner of Ratan India Project) हे दूरस्थ प्रणालीद्वारे हजर होते. त्यांनी हा प्रकल्प चालविण्याची कंपनीची आर्थिक क्षमता राहिली नसल्याने त्यांनी आमदार कोकाटे यांनी सुचविल्याप्रमाणे सरकारी भागीदारीत हा प्रकल्प सुरु करण्याची विनंती पवार यांच्याकडे केली होती. त्याचप्रमाणे रतन इंडियाचे अधिकारी राठोड व त्यांच्या सहकार्‍यांनी आमदार कोकाटे यांना या प्रकल्पातून वीजनिर्मिती होण्यामागील अडथळे सांगून त्यासाठी नेमक्या कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील, याचीही माहिती देऊन त्यांनी आमदार कोकाटे यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला. त्यानुसार कोकाटे वरिष्ठ अधिकार्‍यांकडे बैठक घेऊन पाठपुरावा करत होते. शेवटी सर्वांच्या परिश्रमाची फलनिष्पत्ती झाली.

25 हजार रोजगार उपलब्ध होणार

हा प्रकल्प सुरु झाल्याने पुरेशी वीज उपलब्ध होईल. त्यातून नाशिक विभागातील पाच जिल्ह्यातील विशेष करून नाशिक जिल्ह्यातील कारखानदारी वाढीस लागेल. सिन्नर तालुक्यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष असे 25 हजार रोजगार उपलब्ध होतील. त्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे.

रोजगार संधी वाढतील राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, ऊर्जा विभागाचे अधिकारी, रतन इंडियाचे अधिकारी व केंद्र सरकारच्या एनटीपीसी विभागातील अधिकार्‍यांनी ह्या प्रकल्पातून वीजनिर्मिती सुरु होण्यासाठी प्रयत्न केले. 540 मेगावॉट वीजनिर्मितीतून या भागात रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होणार आहेत.

माणिकराव कोकाटे, आमदार

Related Stories

No stories found.