
पेठ | प्रतिनिधी | Peth
येथील नाशिक-पेठ धरमपूर (Nashik-Peth Dharampur) या राष्ट्रीय महामार्ग (National Highway) क्रमांक ८४८ वरील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातील दंडेलशाहीच्या विरोधात रास्त मागण्या दिर्घकाळापासून प्रलंबित ठेवल्याने उद्भवलेल्या असंतोषाने अदिवासी कृती समितीच्या (Tribal Action Committee) वतीने रास्ता रोको (Rasta Roko) आंदोलन करण्यात आले आहे...
याबाबत अधिक माहिती अशी की, कोटंबी घाट आणि सावळघाटातील (Kotambi Ghat and Saval Ghat) सतत अपघातास कारणीभूत ठरणारी वळणे, रस्ता दुरुस्ती तसेच सक्तीच्या टोल वसुलीच्या विरोधात पक्षभेद विसरून आंदोलनात (Agitation) सामील झाले आहेत. अदिवासी कृती समितीचे यशवंत गावंडे यांच्या नेतृत्वाखाली हा रास्ता रोको करण्यात आला.
दरम्यान, आंदोलनात भास्कर गावीत, भिकाजी चौधरी, रामदास वाघेरे, सुरेश खंबाईत यांच्यासह आदी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. तर तहसिलदार अनिल पुरे व पोलीस निरीक्षक विकास देवरे घटनास्थळी दाखल झाले असून रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहने अडकून पडली आहेत.