पेठ शहरात राष्ट्रवादी कॉग्रेसचा रास्ता रोको

पेठ शहरात राष्ट्रवादी कॉग्रेसचा रास्ता रोको

पेठ | Peth

केंद्र सरकारने (Central Goverment) पेट्रोल, डिझेल सह स्वयंपाकाच्या गॅसच्या (Petrol Diesel Price) किंमतीत केलेल्या दरवाढीचे निर्षधार्त पेठ तालुका (Peth taluak) राष्ट्रवादी कॉग्रेसच्या (NCP Congress) वतीने रास्ता रोको आंदोलन (Rasta Roko Andolan) छेडण्यात आले.

राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष दामू राऊत (NCP taluka president Damu Raut) यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी ( दि. 3 ) रोजी गुजरात राष्ट्रीय महामार्गावर (Peth-Gujrat National highway) पेठ शहरातील जूने बस स्टॅन्ड (Peth Bus Stand) येथे रस्त्यावर रिकामे सिलेंडर ठेऊन दरवाढीविरोधात (Price increase) घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला. पोलीस निरिक्षक रामेश्वर गाडे (Police Inspector Rameshwar Gade) यांना निवेदन देण्यात आले.

या प्रसंगी तालुकाध्यक्ष दामू राऊत, राष्ट्रवादी युवक कॉग्रेस अध्यक्ष गिरीश गावीत, शहराध्यक्ष करण करवंदे, नितिन भोये, मोहन गावंडे, जितेंद्र जाधव, संतोष पेठकर, गोपाळ देशमूख, मोहन पवार, छबीलदास भडांगे, रामदास भोये, शामराव गावंडे,

योगेश नाठे, हनूमंत कडाळी, रामदास गायकवाड, समीर टोपले, अस्लम मनियार,अतूल निरभवणे, भास्कर ठाकरे यांचे सह राष्ट्रवादी कॉग्रेस पदाधिकारी सहभागी झाले होते. पोलीस निरिक्षक रामेश्वर गाडे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पेठ पोलीसांनी बंदोबस्त ठेवला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com