कळवणला ग्रामस्थांचे रस्ता रोको आंदोलन

कळवणला ग्रामस्थांचे रस्ता रोको आंदोलन

कळवण । प्रतिनिधी Kalwan

नवीबेज ग्रामपंचायत Navi Bej Grampanchayat हद्दीतील 200 हेक्टर गायरानवर होणारी अवैध वृक्षतोड Illegal Deforestation थांबविण्यासाठी ग्रामस्थांनी प्रशासनाच्या विरोधात कोल्हापूर फाट्यावर तासभर ठिय्या आंदोलन केले.

दरम्यान आंदोलनस्थळी चर्चे दरम्यान गायरान कृती समितीचे नेते देविदास पवार व प्रशासकीय यंत्रणेशी शाब्दिक चकमक उडाली.त्यामुळे आंदोलन अधिक तीव्र करण्याची भूमिका यावेळी समितीचे नेते पवार यांनी घेतली तर पोलीसांनी कायदेशीर कारवाई करण्याची भूमिका घेण्याचे सांगितले. त्यामुळे आंदोलन तीव्र होण्याची चिन्हे असतांना तहसीलदारांच्या मध्यस्तीने चर्चा झाली. त्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले .

यावेळी तहसीलदार बी ए कापसे, पोलीस उपअधीक्षक अमोल गायकवाड यांनी आंदोलनस्थळी आंदोलकांशी चर्चा केली मात्र आंदोलक आंदोलनावर ठाम असल्यामुळे महसूल, पोलीस यंत्रणेने आंदोलन स्थळापासून बाजूला चर्चा करुन एकमत केल्यानंतर आंदोलक नेत्याशी चर्चा केली त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

यावेळी घनश्याम पवार, पोपट पवार, अँड भाऊसाहेब पवार, शरद निकम, तुळशीराम देवरे यांनी भूमिका स्पष्ट करुन घटनास्थळावरील परिस्थिती स्पष्ट करुन प्रशासनाचा खरपूस समाचार घेतला. यावेळी धनंजय पवार,दीपक खैरनार,अँड भाऊसाहेब पवार, घनश्याम पवार पोपट पवार,साहेबराव पवार, नितीन खैरनार, विनोद खैरनार,मधुकर वाघ,चंद्रकांत पवार,हरी पवार, बाळासाहेब देवरे, प्रल्हाद देवरे, माणिक देवरे, बाळासाहेब खैरनार, दादा महाजन, नरेंद्र वाघ, विशाल वाघ, दीपक खैरनार शशिकांत खैरनार,रमेश खैरनार,नितीन पवार, समाधान पवार,दीपक पवार आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दोघांचा चर्चेस नकार

स्थानिक ग्रामस्थांशी झालेल्या चर्चेच्या फेर्‍यामध्ये या वस्तीवरील 70टक्के आदिवासी बांधवानी वृक्षतोड थांबविण्याचे मान्य केले.मात्र माजी सरपंच मधुकर गांगुर्डे आणि माजी सरपंच सरुबाई जाधव वा इतर सहकार्याना ग्रामस्थांनी चर्चेस बोलविले असता या दोन्ही माजी सरपंचांनी वृक्षतोड करुन गायरानवर हक्क असल्याचे सांगून चर्चेस नकार देऊन आम्ही आमच्या मुद्दावर ठाम असल्याचे सांगितल्यामुळे यांना नेमकी वरदहस्त कोणाचा यावर गावात चर्चा रंगली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com