देवळ्यात आज रास्ता रोको आंदोलन

आंदोलनाचे दिले निवेदन
देवळ्यात आज रास्ता रोको आंदोलन

देवळा | प्रतिनिधी Deola

केंद्र व राज्यसरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ( Onion Growers )प्रतिक्विंटल ५०० रुपये अनुदान (Grants )द्यावे ,या मागणीसाठी गुरुवारी (दि.१९ ) रोजी सकाळी १० वाजता देवळा बाजार समिती ( Deola APMC ) समोर राज्य कांदा उत्पादक संघटना (State Onion Growers Association ) ,स्वाभिमानी शेतकरी संघटना ( Swabhimani Shetkari Sanghatna ) व प्रहार जनशक्ती पक्षाच्या ( Prahar Janshakti Party )वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे . अशी माहिती संबंधित संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे

पत्रकाचा आशय असा की , सध्या उत्पादीत कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे ,दिवसेंदिवस कांद्याचे दर घसरत चालले असुन, त्यातून उत्पादन खर्चही निघत नाही , त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रंचड नैराश्याची भावना निर्माण होऊन कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या सारखं टोकाचं पाऊल उचलताना दीसत असल्याचे चित्र दिसत आहे .

या बाबतीत केंद्र आणि राज्य शासनाने तातडीने आर्थिक मदत दिली पाहिजे, त्यासाठी तात्काळ कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ५०० रुपये प्रति क्विंटल अनुदान देण्यात यावे या मागणीसाठी गुरुवारी दि १९ रोजी सकाळी १० वाजता देवळा येथिल बाजार समिती समोरील राज्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे,त्या संदर्भाचे निवेदन तहसीलदार, बाजार समितीचे सभापती ,व पोलिस उपनिरीक्षक यांना देण्यात आले ,

या रास्ता रोको साठी तालुक्यातील बहुसंख्य कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे, संपर्क प्रमुख कुबेर जाधव , जिल्हा अध्यक्ष जयदीप भदाने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शिरसाठ , प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष क्रुष्णा जाधव ,व्यंगचित्रकार किरण मोरे ,तालुका अध्यक्ष शिवाजी पवार , जिल्हा समानव्यक भगवान जाधव, मधुकर पाचपिंडे, जिल्हा सरचिटणीस दुषा्ंत पवार ,कळवण तालुका अध्यक्ष विलास रौंदळ, आदींनी केले आहे .

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com