
मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon
शहरात आज गुढीपाडवा (Gudhipadva) व हिंदू नववर्षदिनानिमित्त (Hindu New Year's Day) राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे (Rashtriya Swayamsevak Sangh) दोन वेगवेगळ्या मार्गाने पूर्ण गणवेशात सघोष, सदंड पथसंचलन काढण्यात आले. दोन्ही संचलनाआधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक (Founder of Rashtriya Swayamsevak Sangh), आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार (Dr. Keshav Baliram Hedgewar) यांना प्रणाम देण्यात आला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे (RSS) शहरात दरवर्षी विजयादशमी (Vijayadashami) व गुढीपाडव्यास (Gudhipadva) सघोष, सदंड पथसंचलन काढले जाते. आज गुढीपाडव्यानिमित्त सकाळी व सायंकाळी दोन संचलने काढली गेली. पहिले संचलन सकाळी 7 वाजता सावतानगर, संगमेश्वर येथून खलीलशेट चाळ, काकूबाईचा बाग, जगताप गल्ली, जुना होळी चौक, ज्योतीनगर ते सावतानगर या मार्गाने काढण्यात आले तर दुसरे संचलन सायंकाळी 5.30 वाजता स्व. बाळासाहेब ठाकरे तालुका क्रीडा संकुल (Balasaheb Thackeray Taluka Sports Complex) येथून साठफुटी रोडमार्गे अहिंसा सर्कल, मोसमपूल, श्रीरामनगर,
डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर, वर्धमाननगर, स्टेट बँक कॉर्नर मार्गे आपल्या गंतव्यस्थानी पोहोचले. यावेळी घोषाच्या तालावर संचलन करणार्या स्वयंसेवकांच्या मध्यभागी अश्वावर भगवा ध्वज ठेवण्यात आला होता. नागरिकांनी पथ संचलन मार्गावर आकर्षक रांगोळ्या काढून व स्वयंसेवकांवर पुष्पवर्षाव करून संचलानाचे उत्साहात स्वागत केले. संचलनात 250 स्वयंसेवक सहभागी झाले होते.
संचलनाचे मुख्य शिक्षक अतुल जैन व अंकित पिंगळे होते.
यावेळी रा.स्व. संघाच्या वतीने स्वयंसेवकांचे स्वागत करण्यास व उत्साह वाढविण्यासाठी मालेगाव जिल्हा संघचालक अशोक कांकरिया, शहर संघचालक नितीन मुनोत, जिल्हा कार्यवाह सुनील चव्हाण, शहर कार्यवाह अतुल शिरोडे, सहकार्यवाह राकेश मालपुरे, कल्पेश कांकरिया आदी उपस्थित होते.