प्रा.डॉ.वर्षा भालेराव यांना राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार

प्रा.डॉ.वर्षा भालेराव यांना राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मनपाच्या माजी नगरसेविका प्रा.डॉ.वर्षां अनिल भालेराव (Former corporator Prof. Dr. Varshan Anil Bhalerao) यांनी विविध क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेत

आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था (International Environmental Friendly Multipurpose Organization), भारत (india) यांच्या वतीने त्यांना राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार (Rashtriya Rajbhushan Puraskar) देऊन गौरविण्यात आले.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष देवा तांबे, आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष सुहासिनी भामरे, आंतरराष्ट्रीय सेक्रेटरी सौरभ हजारे, राष्ट्रीय सेक्रेटरी दीपक काळे, नाशिक जिल्हा महिला अध्यक्ष भारती आहेर, उपाध्यक्ष संगीता जाधव, युवक संघटक प्रभाकर गाडे आदींनी त्यांची निवड केली. फ्रावशी इंटरनॅशनल स्कूल मध्ये सायन्स विभागाच्या प्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या नगरसेविका प्रा. डॉ.वर्षा भालेराव यांना यापूर्वी नाशिक सिटीझन फोरम (Nashik Citizen Forum) च्या वतीने विशेष कार्य पुरस्कार,

लायन्स क्लब (Lions Club) च्या वतीने आदर्श शिक्षिका पुरस्कार (Ideal Teacher Award), संत गाडगेबाबा पतसंस्थेच्या वतीने कर्मवीर काकासाहेब सोलापूरकर नाशिक भूषण पुरस्कार, अखिल भारतीय पत्रकार संस्थेच्या वतीने आदर्श नगरसेविका पुरस्कार, वीरांगना पुरस्कार यांच्यासह अनेक संस्थानी त्यांना सन्मानित केले आहे.

नाशिक महानगरामध्ये शहर बस सेवेची संख्या कमी करत हि सेवा चालविण्यास असमर्थता दर्शविल्यानंतर सप्टेंबर 2017 मध्ये नाशिक मनपाच्या महासभेत प्रश्न उपस्थित करून या विषयाला चालना दिली.. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री मा.श्री. गिरीष महाजन यांचे कडे े सातत्याने पाठपुरावा करून नाशिक शहर बस सेवेची गरज निदर्शनास आणून देत सिटीलिंक शहर बस सेवेचा शुभारंभ नाशिक महानगरात झाला.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com