'या' तारखेला रासाका गाळप हंगामाचा शुभारंभ

'या' तारखेला रासाका गाळप हंगामाचा शुभारंभ

पालखेड मिरचीचे । वार्ताहर | Plakhed

स्व.अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्था पिंपळगाव बसवंत संचलित कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखान्याचा (Karmaveer Kakasaheb Vagh Cooperative Sugar Factory) 40 वा गळीत हंगामाचा शुभारंभ

शनिवारी (दि.29) सकाळी 10 वाजता होणार असल्याची माहिती आमदार दिलीप बनकर (MLA Dilip Bankar), स्व.अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन रामभाऊ माळोदे, व्हा.चेअरमन अरविंद जाधव, कार्यकारी संचालक गणेश जनसंपर्क संचालक दिनेश बागरेचा आदींसह संचालक मंडळाने दिली आहे.

या गळीत हंगामाचा शुभारंभ राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Former Deputy Chief Minister and Leader of Opposition in Legislative Assembly Ajit Pawar) यांचे हस्ते होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ (Former Guardian Minister Chhagan Bhujbal) तर प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री दादा भुसे (Guardian Minister Dada Bhuse), माजीमंत्री धनंजय मुंडे (Former Minister Dhananjay Munde), विधानसभेचेे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narahari Jirwal, Vice President of Legislative Assembly) उपस्थित आहेत.

कर्मवीर काकासाहेब वाघ व तात्यासाहेब बोरस्ते या गुरू-शिष्याच्या त्यागातुन व कष्टातुन या परिसरात रासाकाची स्थापना होऊन परिसराचे नंदनवन झाले. रोजगार निर्मिती (Employment generation) होऊन नागरीकांचे जिवनमान उंचावले. उत्कृष्ट व निर्यातदार साखर म्हणून रासाकाच्या (RASAKA) साखरेचा गोडवा राज्यात वाढू लागला. मात्र त्यानंतर अलिकडच्या काळात रासाका बंद पडला. साहजिकच सदरचा कारखाना अवसायनात निघाला.

अनेक संस्थांनी तो चालविण्यास घेतला; परंतू त्यांनी रासाकासह कामगार, ऊस उत्पादक (Sugarcane growers) यांची देणी थकवून पळ काढला. परिणामी पुन्हा काही वर्ष रासाका बंद अवस्थेत राहिला. त्यानंतर अनेकांनी त्यासाठी प्रयत्न केले परंतू ते यशस्वी न झाल्याने 2019 च्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) अजित पवार (Ajit Pawar) यांनी निफाडच्या सभेेत जनता व ऊस उत्पादकांना शब्द दिला की तुम्ही दिलीप बनकरांना आमदार करा मी तुमचा कारखाना चालू करतो त्याप्रमाणे निफाडच्या (niphad) जनतेने दिलीप बनकरांच्या झोळीत भरभरून मतांचे दान टाकत त्यांना आमदार केले.

परंतू आता आपल्या नेत्याने दिलेला शब्द पाळण्यासाठी दिलीप बनकरांनी कंबर कसली. कारखाना चालविण्यास घेण्यासाठी कायद्यात बदल करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर परिश्रम घेतले. अखेर स्व.अशोकराव बनकर पतसंस्थेने भाडेतत्वावर चालविण्यास घेऊन 39 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ मागील वर्षी शरदचंद्र पवार यांच्या हस्ते करण्यात आला.

यावर्षी 3 लाख टन उस गाळपाचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. गाळप हंगाम यशस्वी व्हावा यासाठी परिसरातील रस्त्यांसह पायाभूत सुविधा पूर्ण करून बंद काळात झालेल्या ओसाड माळरानाचे आज पुन्हा नंदनवन झाले आहे. कर्मवीरांचे स्मारक कारखाना येत्या तीन वर्षात नफ्यात आल्याशिवाय राहणार नाही. अल्कोहोल, इथेनॉल, स्पिरीट हे उत्पादने यावर्षी सुरू होत आहे. परिसरातील ऊस ऊत्पादकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे सर्व संचालक मंडळासह आमदार दिलीप बनकर यांनी केले आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com