सिन्नरला भाजी बाजारातच भाजी विक्रेत्यांची रॅपिड टेस्ट

सिन्नरला भाजी बाजारातच भाजी विक्रेत्यांची रॅपिड टेस्ट

दोघांची इंडिया बुल्स कोविड सेंटरला रवानगी

सिन्नर । Sinnar

शहरातील भाजी बाजारातील गर्दीला अटकाव घालण्यासाठी व कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत.

शनिवारी प्रशासनाने भाजी बाजारातच विक्रेत्यांची रॅपिड टेस्ट करण्याचा निर्णय घेऊन पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या दोघा विक्रेत्यांची रवानगी थेट इंडियाबुल्स येथील कोविड सेंटरला केली असल्याची माहीती आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव यांनी दिली.

एकूण 100 चाचण्या करण्यात आल्या. पैकी 98 विक्रेत्यांचे अहवाल निगेटिव्ह आले. निगेटिव्ह टेस्ट आलेल्या विक्रेत्यांना जागेवरच प्रमाणपत्र देऊन त्यांना बाजारात भाजीपाला विक्रीसाठी बसण्याची परवानगी दिली.

प्रमाणपत्राची मुदत 15 दिवसांची असून विक्रेत्यांनी ते जवळ बाळगणे आवश्यक आहे. प्रमाणपत्र नसणार्‍या विक्रेत्यांना भाजीबाजारात बसू दिले जाणार नसल्याच्या सूचना प्रशासनाने विक्रेत्यांना दिल्या.

शहरातील मुख्य बाजारपेठ बंद असली तरी भाजीबाजारात मात्र गर्दी कमी होण्याचे नाव घेत नाही. अनेक नागरिक कारण नसताना भाजीबाजारात फिरकत आहेत. भाजीविक्रेत्यांपासूनही कोरोनाचा संसर्ग होण्याचा मोठा धोका आहे.

विक्रेत्यांना कोरोनाची लागण झालेली असल्यास ही मंडळी सुपर स्प्रेडर ठरू शकते. ही शक्यता गृहीत धरून आरोग्य विभागाने भाजी विक्रेत्यांची थेट बाजारात जाऊन रॅपिड टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. निगेटिव्ह अहवाल येणार्‍या भाजी विक्रेत्यांना आरोग्य विभागाकडून पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरनार यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र देण्यात आले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com