Nashik : धर्मांतराचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार

Nashik : धर्मांतराचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार

सिन्नर | प्रतिनिधी | Sinner

येथे एका ३५ वर्षीय महिलेला (women) धर्मांतराचे प्रलोभन दाखवत गुंगीचे औषध देऊन दोघांनी डांबून ठेवत तर तिघांनी महिलेवर अत्याचार (rape) केल्याची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे....

याबाबत अधिक माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील (Sangamner Taluka) ही महिला माळेगाव औद्योगिक वसाहतीत (Malegaon Industrial Estate) मजुरी करून उदरनिर्वाह करते. सिन्नर शहरातील वैदुवाडीतील हनुमान मंदिराजवळ राहणाऱ्या बुटी, प्रेरणा (दोघांची पूर्ण नावे माहीत नाहीत),भाऊसाहेब उर्फ भावड्या दोडके, राहुल फादर व अंदाजे चाळीस वर्षाचा एक अनोळखी इसम यांनी मिळून या महिलेला धर्मांतराचे (Conversion) आमिष दाखवत आपल्या घरी बोलावून घेतले.

Nashik : धर्मांतराचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार
नाशकात तरुणींमध्ये 'फ्री स्टाईल'

त्यानंतर ३० नोव्हेंबर ते २९ डिसेंबर २०२२ या महिनाभराच्या कालावधीत गुलाबी रंगाचे पाणी पाजत गुंगी आणून दोन आरोपींनी महिलेस डांबून ठेवले. तर इतर आरोपींनी महिलेशी अंगलट करत तिच्यावर वेळोवेळी आळीपाळीने अत्याचार केला. तसेच तिच्या मुलांना भीक (Begging) मागण्यास भाग पाडत महिलेला शिवीगाळ आणि दमदाटी करून मारहाण केली.

Nashik : धर्मांतराचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार
क्रिकेटच्या मैदानात छगन भुजबळांची तुफान फटकेबाजी

दरम्यान, यानंतर ४ फेब्रुवारीला सदर महिलेने सिन्नर पोलीस ठाण्यात (Sinnar Police Station) तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी (Police) पाचही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून उपअधीक्षक डॉ. अर्जुन भोसले पुढील तपास करत आहेत.

Nashik : धर्मांतराचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार
नोकरीचे आमिष दाखवून आठ लाखांची फसवणूक
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com