उपनगरमध्ये महिलेवर अत्याचार

उपनगरमध्ये महिलेवर अत्याचार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

उपनगर पोलीस स्टेशनच्या (Upnagar Police Station) हद्दीत एका महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार केल्याची घटना घडली आहे. (Rape case in upnagar) महिलेने लग्नाची मागणी करताच संबंधित युवकाने जातीवाचक शब्दांचा उल्लेख करत लग्न करण्यास नकार दिला.... (rape on woman at upnagar area nashik)

फिर्यादी यांनी मुलाच्या आईला सांगितल्यानंतर तिने देखील जातीवाचक शब्दांचा वापर करत संपवून टाकण्याची धमकी दिली. किरण भिवाजी गाडे (वय ३०) आणि रेखा भिवाजी गाडे (वय ४५) रा. नाशिकरोड मूळ गाव वाशीम असे दोन्ही संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित किरण याने महिलेस लग्नाचे आमिष दाखवत तिचा विश्वास संपादन करत वारंवार मनाविरुद्ध शारीरिक संबंध ठेवत नैसर्गिक आणि अनैसर्गिक अत्याचार केला आहे.

महिलेने लग्न करण्याची मागणी केली असता जातीवाचक शब्द वापरत तुझ्यासोबत लग्न करणार नाही, तू दुसरा शोध असे सांगून गावी निघून गेला. आरोपी किरणच्या आईनेदेखील जातीवाचक शब्द आणि शिवीगाळ करत तू माझ्या मुलाचा नाद सोड अन्यथा तुला संपवून टाकेल अशी धमकी दिली.

याबाबत सहायक पोलीस आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ यांचेसह उपनगर पोलीस अधिक तपास करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com