कारवाडी येथे शिक्षिकेवर अत्याचार

कारवाडी येथे शिक्षिकेवर अत्याचार

सिन्नर | प्रतिनिधी

प्राथमिक शाळा शिक्षिकेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केले. तसेच अश्लील व्हिडीओ व छायाचित्र काढून ते सोशल मीडियावर टाकून बदनामी केल्याची घटना तालुक्यातील कारवाडी येथे घडली. याप्रकरणी वावी पोलिस ठाण्यात संंशयित दिपक नवनाथ बहिरट याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पिडीत शिक्षिकेला दीपक बहिरट याने प्रेमाच्या जाळ्यात ओढून गोवा, सापुतारा तसेच सावळी विहीर येथील एका लॉजवर नेऊन शारीरिक संबंध ठेवले तसेच अश्लील व्हिडिओ व फोटो काढले.

ते सोशल मीडियावर टाकले. या शिक्षिका शाळेत जात असताना वाद घालून माझ्याशी लग्न कर, असे म्हणत विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. पिडीतेला मारहाण केली. दरम्यान, संशयित बहिरट हा घटनेनंतर फरार झाला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com