अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार : नराधमास जन्मठेप

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार : नराधमास जन्मठेप

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास न्यायालयाने (Court) दोषी ठरवत जन्मठेप (life imprisonment) व २० हजार रुपये दंडाची शिक्षा (Penalty) सुनावली...

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सप्टेंबर २०१६ मध्ये नवीन नाशकातील सेंट लॉरेन्स शाळेसमोर एका पिडीत मुलीस किसन जयप्रकाश नागर (Kisan Jaiprakash Nagar) (२१ रा. प्लॉट नं. २, अक्षयपार्क अपार्टमेंट संभाजी स्टेडीयम जवळ,नवीन नाशिक) याच्यासह पाच विधिसंघर्षित बालकांनी संगनमत करून हाईक ग्रुपवरील ओळखीचा फायदा घेत लैंगिक अत्याचार केला होता.

याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police Station) पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हयाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक, वैशाली शिंदे यांनी करत आरोपीविरुद्ध सबळ पुरावे गोळा करत किसन जयप्रकाश नागर याच्या विरुध्द जिल्हा व सत्र न्यायालय, नाशिक येथे दोषारोपपत्र दाखल केले होते.

सबळ पुराव्यामुळे न्यायालयाने नागर यास दोषी ठरवत जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक ०३ न्यायाधीश मृदुला भाटीया यांनी जन्मठेप व २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

या खटल्यात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता म्हणून आर.एम. कोतवाल यांनी कामकाज बघितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com