
नाशिक | प्रतिनिधी
मुंबई (Mumbai) येथील एका व्यक्तीने नाशिकच्या महिलेशी शेअरचॅटद्वारे (Share Chat) मैत्री केली. संबंधित महिलेला लग्न मोडण्याची धमकी देऊन त्या व्यक्तीने वेळोवेळी अत्याचार (Rape) केला. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात (Bhadrakali Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.....
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला ही नाशिक (Nashik) येथे राहते. या महिलेशी मुंबईच्या (Mumbai) व्यक्तीने शेअरचाटद्वारे मैत्री केली होती. महिलेचा विश्वास संपादन करून तिला शिर्डी (Shirdi) येथे दर्शनासाठी नेले.
शिर्डीत पीडित महिलेशी परिचय वाढवून त्याने सेल्फी काढले. ते सेल्फी महिलेच्या नियोजित पतीला पाठवून महिलेचे लग्न मोडण्याची धमकी त्याने दिली. त्यानंतर पीडित महिलेस वणी (Vani), त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथील लॉजवर नेऊन वेळोवेळी जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. हां प्रकार दि. १८ ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान घडला.
महिलेच्या संमतीशिवाय शारीरिक संबंध या व्यक्तीने निर्माण केले. महिलेने या संबंधास प्रतिकार केला असता तिला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात मुंबईच्या व्यक्तीविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार करीत आहेत.