अल्पवयीन मुलीचा विनयभंग : न्यायालयाने दिली 'ही' शिक्षा

अल्पवयीन मुलीचा विनयभंग : न्यायालयाने दिली 'ही' शिक्षा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

घरात कुणी नसल्याचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग व एका महिलेच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याप्रकरणी आरोपीला न्यायालयाने सहा वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली...

याबाबत सविस्तर वृत्त असे की, इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या (Indiranagar Police Station) हद्दीत म्हाडा बिल्डींग, वडाळागाव येथे आरोपी हुजेफ रौफ शेख, (२१, रा. हनुमान मंदिराशेजारी, माळी गल्ली नं २, वडाळागाव, नाशिक) याने फिर्यादीच्या घरात कुणी नसल्याचा फायदा घेत त्यांच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला.

त्यानंतर त्याचा बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या एका महिलेच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात बालकांचे लैगिंग अत्याचार प्रतिबंधक कायदा पॉस्को व अन्य कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचा तपास सहाय्यक निरीक्षक एन. एस. बोंडे यांनी करत आरोपीविरुद्ध सबळ पुरावे गोळा करून, गुन्हा शाबीत होण्याचे दृष्टीने प्रयत्न करून आरोपीविरुद्ध  जिल्हा व सत्र न्यायालय, नाशिक येथे दोषारोपपत्र दाखल केले होते.

अल्पवयीन मुलीचा विनयभंग : न्यायालयाने दिली 'ही' शिक्षा
घटस्फोटानंतर समांथा, नागा चैतन्य पुन्हा येणार एकत्र?

आरोपीविरुध्द फिर्यादी, साक्षीदार, पंच यांनी दिलेली साक्ष व तपासी अंमलदार यांनी सादर केलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरून जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक ०३, नाशिक न्यायमूर्ती  एम. व्ही. भाटीया यांनी आरोपी शेख याला सहा वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तिन महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली.

या खटल्यात सरकारी पक्षातर्फे सहाय्यक  सरकारी अभियोक्ता म्हणून आर. एम. कोतवाल यांनी तसेच पैरवी अधिकारी म्हणून पोलीस नाईक एस. एस. गायकवाड, एस. यु. गोसावी कामकाज पाहिले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com